ताज्याघडामोडी

भावनिक क्षणांत रंगला सिंहगडमध्ये अंतिम वर्षाचा निरोप समारंभ

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपुर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग व सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन (सेसा) यांच्या सयुक्त विद्यामाने अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी फेअरवेल २ के २६ या निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
हा कार्यक्रम 04 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1.00 पर्यंत सिव्हिल इंजिनिअरिंग सेमिनार हॉलमध्ये पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना त्यांचे चार वर्षाच्या महाविद्यालयीन प्रवासासाठी शुभेच्छा देणे व त्यांच्या आठवणी उजाळा देणे हा होता.
कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. शेखर पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी आणि डिन डॉ. चेतन पिसे व सिव्हिल इंजिनिअर विभागाचे विभाग प्रमुख डॉ. यशवंत पवार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांचे उज्वल भविष्यसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत मनोगत व्यक्त केले. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, गीत संगीत आणि मैत्रीच्या गप्पांनी संपूर्ण वातावरण आनंददायी झाले होते. फेअरवेल २ के २६ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कायमस्वरूपी ठसा उमटवणारा ठरला. तसेच या कार्यक्रमाच्या अनुषंगाने विभागातील अंतिम वर्षातील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून सुजल कवडे यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि व्यवस्थापनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकाचे कौतुक केले.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचा निकालाचा चढता आलेख कायम

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक उत्साहात संपन्न; नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड

पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक आणि नूतन पदाधिकारी निवड कार्यक्रम आज,…

7 days ago

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 month ago