पंढरपूर : प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाचा पालक मेळावा शनिवार, दि. ०७ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला, अशी माहिती विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनी दिली. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या कार्यक्रमात पालक प्रतिनिधी कैवल्य शेटे, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे, डॉ. नामदेव सावंत, डॉ. विनायक जगताप आदी उपस्थित होते. पालक प्रतिनिधी कैवल्य शेटे यांचे महाविद्यालयाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी पालकांना संबोधित केले. त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. तसेच पाल्याशी संवाद वाढवण्याचे, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पालक कैवल्य शेटे यांनी कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले. त्यांनी महाविद्यालयाबद्दल समाधान व्यक्त करत पालकांनी आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक गोष्टींकडे लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे सांगितले. पालक राजेंद्र डोंगरे यांनीही मनोगत व्यक्त करत महाविद्यालयाच्या सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत समाधान दर्शविले. तसेच पालक राजकुमार ताठे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसह महाविद्यालयाच्या कामगिरीचे कौतुक केले.
या मेळाव्यात विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनी विभागाचा सविस्तर आढावा सादर केला. यावेळी संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील विद्यापीठात यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला. हा पालक मेळावा यशस्वी करण्यासाठी पालक मेळावा प्रतिनिधी प्रा. उदयकुमार फुले, विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उदयकुमार फुले यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. नामदेव सावंत यांनी मानले. या कार्यक्रमामुळे पालक आणि महाविद्यालय यांच्यातील संवाद अधिक दृढ झाला, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष ठेवण्याची संधी मिळाली, तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रेरणा दिली गेली.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक आणि नूतन पदाधिकारी निवड कार्यक्रम आज,…
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…