Categories: Uncategorized

राज्यस्तरीय ‘डिपेक्स’ प्रकल्प स्पर्धेमध्ये कर्मयोगी पॉलिटेक्निकचे घवघवीत यश

तंत्रज्ञानाच्या कुंभमेळ्यात कर्मयोगीच्या विद्यार्थ्यांचे यश

नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय तंत्रज्ञान व प्रकल्प प्रदर्शनामध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर च्या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादित केले आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल विभागामधील विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जेचा वापर करून आर एफ आयडिया आधारित पेट्रोल पंप स्वयंचलन प्रणाली या विषयावर प्रकल्प सादर केला होता. यामध्ये इलेक्ट्रिकल विभागातील कु. सारंग दिनेश शिंदे, विश्वजीत वैजनाथ मस्के, हर्षवर्धन हनुमंत शेंडगे व रोहित शंकर अवताडे विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तसेच सिव्हिल विभागातील विद्यार्थ्यांनी पुनर्वापरित प्लास्टिक, टाकाऊ वाळू आणि बारीक केलेला कचरा वापरून पर्यावरणपूरक वीट तयार करणे या नाविन्यपूर्ण उपक्रमास प्रथम क्रमांक पटकाविला. यामध्ये ओम मनोज हावळ, सुरज नाना कवडे, श्रीराज यशवंतराव राजे घाडगे, दादासाहेब जालिंदर मसवडे या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विभागा मधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सिम किंवा इंटरनेट किंवा वाय-फाय वापरून दहा की.मी.पर्यंत संवाद साधणारे संवाद प्रणाली या नाविन्यपूर्ण उपक्रमास द्वितीय क्रमांकाचा बहुमान मिळाला. यामध्ये कु.आकाश धनराज गिरी गोसावी, ओंकार दिनेश गायकवाड, सुहास सोमनाथ भोसले, नागेश रामचंद्र अडत विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवित यश संपादित केले.

या प्रकल्प स्पर्धा छत्रपती संभाजी नगर येथील एमआयटी कॅम्पस येथे सृजन ट्रस्ट आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीने राज्यस्तरीय स्तरावर आयोजित करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व्यासपीठ देणे, समाजातील प्रश्नावर तांत्रिक उपाय शोधणे, गतिमान संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण विकासासाठी सामाजिक व तांत्रिक नवकल्पना तयार करणे या हेतूने या प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा महाराष्ट्र, गोव्यातील आय टी आय, डिप्लोमा व डिग्री विद्यार्थ्यांसाठी घेतले जाते. यामध्ये मोबिलिटी, शाश्वत नागरी पायाभूत सुविधा, कृषी तंत्रज्ञान, वैद्यकीय तंत्रज्ञान, ऊर्जा,कचरा व्यवस्थापन आणि सायबर सुरक्षा इ. या विषयावर घेण्यात आली होती. ४०० हून अधिक प्रकल्पातील नाविन्यपूर्ण कार्यरत प्रकल्प होते. संकल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि उपयोगिता यामुळे प्रकल्पाची निवड करण्यात आली.
या प्रकल्प स्पर्धेसाठी प्रकल्प मार्गदर्शक प्रा. आर एस भोई, प्रा. जी ए कोरके, प्रा. एम एस धुमाळ, प्रा आर एल माने, प्रकल्प समन्वयक प्रा. एन आर.उत्पात, विभाग प्रमुख प्रा. व्ही व्ही पालीमकर, प्रा. आय जे कोरबू, प्रा.आर आर खिस्ते यांनी मार्गदर्शन केले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, प्राचार्य डॉ.अजित कणसे, प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील, संस्थेचे रजिस्ट्रार गणेश वाळके व सर्व प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचा निकालाचा चढता आलेख कायम

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक उत्साहात संपन्न; नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड

पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर तालुका पोलीस पाटील संघटनेची आढावा बैठक आणि नूतन पदाधिकारी निवड कार्यक्रम आज,…

7 days ago

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 weeks ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

4 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

4 weeks ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 month ago