इंटर इंजिनियरिंग डिप्लोमा स्टूडेंट स्पोर्ट असोसिएट यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूरच्या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन करून अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यामध्ये उपविजेते पद पटकाविले. सदरच्या स्पर्धा समर्थ पॉलिटेक्निक जुन्नर येथे पार पडल्या.
सदर स्पर्धेसाठी एकूण १२ संघाने सहभाग नोंदवलेला होता. यामध्ये गीता डी तटकरे कॉलेज, रायगड विरुद्ध कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्निक) पंढरपूर यांच्यामध्ये अंतिम सामना चुरशीचा झाला. यामध्ये कर्मयोगी पॉलिटिकल कॉलेजला उपविजेते पद मिळाले.
तसेच इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टूडेंट स्पोर्ट असोसिएट यांच्या वतीने सी झोन ॲथलेटिक्स स्पर्धा कर्मयोगी पॉलिटेक्निक कॉलेज पंढरपूर येथे पार पडल्या होत्या. या स्पर्धेत कर्मयोगी ची विद्यार्थिनी कुमारी पायल वाघमारे ४०० मीटर व २०० मीटर मध्ये विजेती तर कु.अंकिता जाधव ४०० मीटर रनिंग मध्ये उपविजेती ठरली. कु. सृष्टी पिसाळ लांब उडी स्पर्धेमध्ये व तेहरी उडी मध्ये विजेती ठरली तसेच कु ऋतुजा सर्जे भालाफेक स्पर्धेमध्ये मध्ये उपविजेती तर माऊली वाघमारे याने १५०० मीटर मध्ये विजेते पद पटकविले
सदरच्या क्रीडा स्पर्धेतील उल्लेखनीय यशाबद्दल श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, प्राचार्य डॉ.अजित कणसे, प्राचार्य डॉ. एस पी पाटील, संस्थेचे रजिस्ट्रार गणेश वाळके यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक बी जे साळुंखे यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…