ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग विषयावर जनजागृती सत्र संपन्न

पंढपूर सिंहगड महाविद्यालयातील यांत्रिकी विभागामध्ये यांत्रिकी अभियांत्रिकी विभाग आणि इंडियन सोसायटी फॉर नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग या विषयावर जनजागृती सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील इंडियन सोसायटी फॉर नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग क्लब चॅप्टरचे अध्यक्ष श्री. उदय काळे उपस्थित होते. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य स्वानंद जी. कुलकर्णी, यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचे विभागप्रमुख डॉ. एस. एस. कुलकर्णी तसेच समन्वयक प्रा. ए. एस. कुलकर्णी आणि प्रा. ओ. एन. ठिगळे उपस्थित होते.

यावेळी उदय काळे यांनी नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगची मूलभूत संकल्पना, त्याचे औद्योगिक महत्त्व आणि विविध चाचणी पद्धतींबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. अल्ट्रासोनिक टेस्टिंग, रेडिओग्राफिक टेस्टिंग, मॅग्नेटिक पार्टिकल टेस्टिंग आणि एडी करंट टेस्टिंग या पद्धतींचा उद्योगांमध्ये कसा वापर केला जातो, याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले. उत्पादन प्रक्रियेत दोष शोधणे, गुणवत्ता नियंत्रण राखणे आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे यासाठी नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

तसेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) च्या संशोधन व विकास विभागातील करिअर संधींबाबत माहिती देत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या मार्गदर्शन सत्राला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवून लाभ घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी प्रमुख मार्गदर्शकांचे आभार मानले व असा उपक्रम विद्यार्थ्यांच्या भविष्याकरिता निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी होणेकरिता विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

29 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago