ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर येथे मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर येथे दि. 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दिवस मराठी साहित्याचे थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जन्मदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. या दिनानिमित्त प्रशालेतील मराठी विभागाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी नाटक, समूहगीत व समूह नृत्य अशा वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमांतून मराठी भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध साहित्यपरंपरा व सांस्कृतिक वारसा यांचे प्रभावी दर्शन घडले.

कार्यक्रमप्रसंगी प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शनी सरदेसाई मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मराठी भाषा ही आपली अस्मिता असून तिचे जतन व संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे, असे त्यांनी आपल्या भाषणात नमूद केले. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगून दैनंदिन जीवनात तिचा अभिमान बाळगावा असे सांगितले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे व शिक्षकांच्या परिश्रमामुळे मराठी राजभाषा गौरव दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व यशस्वीरीत्या पार पडला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

29 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago