ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागामध्ये ‘सिग्नल्स अँड सिस्टम’ विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन

अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग व इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी “इंटरऍक्टिव्ह सेशन ऑन सिग्नल्स अँड सिस्टम” या विषयावर अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः आयोजित करण्यात आला होता.
या व्याख्यानासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. गणेश बी. बिराजदार, सहाय्यक प्राध्यापक, डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, आकुर्डी, पुणे हे उपस्थित होते. त्यांनी ‘सिग्नल्स अँड सिस्टीम’ या विषयातील मूलभूत तसेच प्रगत संकल्पना विद्यार्थ्यांना सोप्या, उदाहरणाधारित व संवादात्मक पद्धतीने समजावून सांगितल्या.
‘सिग्नल्स अँड सिस्टीम’ हा विषय इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, कंट्रोल सिस्टीम आणि सिग्नल प्रोसेसिंग या क्षेत्रांचा पाया मानला जातो. या विषयामध्ये सतत व विच्छिन्न सिग्नल्स, वेळ क्षेत्र व वारंवारिता क्षेत्र विश्लेषण, फुरिअर सिरीज व फुरिअर ट्रान्सफॉर्म, लॅप्लास ट्रान्सफॉर्म, झेड-ट्रान्सफॉर्म, सिस्टीमची स्थिरता, रेखीयता, कारण-परिणाम संबंध आणि इम्पल्स रिस्पॉन्स यांसारख्या संकल्पनांचा सखोल अभ्यास केला जातो.
डॉ. बिराजदार यांनी या संकल्पनांचे मोबाईल कम्युनिकेशन, ऑडिओ-व्हिडिओ सिग्नल प्रोसेसिंग, नेटवर्क विश्लेषण, कंट्रोल सिस्टीम डिझाइन तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय ) आधारित अनुप्रयोगांमध्ये असलेले महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी गणितीय विश्लेषण आणि प्रत्यक्ष अभियांत्रिकी समस्यांमधील संबंध विद्यार्थ्यांना उदाहरणांसह पटवून दिला.
या कार्यक्रमास ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी विविध शंका उपस्थित करून सक्रिय सहभाग नोंदवला. त्यामुळे सत्र अधिक ज्ञानवर्धक व संवादात्मक ठरले.
कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. महेश झाडे यांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. तसेच प्रा. स्वप्निल टाकळे, श्री. आशिष येडगे व सौ. अश्विनी राऊत यांनी विशेष परिश्रम घेतले. इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स समन्वयक प्रा. वैभव गोडसे, विभागप्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कु. अस्मिता चव्हाण हिने केले. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना ‘सिग्नल्स अँड सिस्टीम’ विषयाचे सखोल ज्ञान मिळून त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीस निश्चितच चालना मिळाली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

40 minutes ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago