Categories: Uncategorized

पंढरपुरात ‘त्या’ सराफाला न्याय मिळण्यासाठी सराफ सुवर्णकार संरक्षण समिती अक्रमक

उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन देत केली महत्वपूर्ण मागणी 

पंढरपूर येथील स्टेशन रोडवर असणाऱ्या एस टी कदम ज्वेलर्स चे मालक दिलीप कदम यांना परवा रात्री अज्ञात लोकांनी चारचाकी गाडी ने धडक देऊन जखमी करुन त्यांच्या जवळील रोख रक्कम व ऐवज आसलेली बॅग पळवून नेली वारंवार सराफांच्या बाबत आशा घटना घडत आहेत आशा घटनांना पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करून आसे कृत्य करणारास कडक शिक्षा करावी. या साठी भारतीय नरहरी सेना प्रणित सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य अक्रमक झाली असून त्याचाच एक भाग म्हणून आज उपविभागीय पोलीस अधिकारी  प्रशांत डगळे साहेब व वरिष्ठ  पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे साहेब यांना लेखी निवेदन देण्यात आले. निवेदनात सदर घटनेची सखोल व तत्काळ चौकशी करून दोषींना त्वरित अटक करण्यात यावी व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी पंढरपूर व परिसरातील सराफ सुवर्णकार व सलग्न व्यवसायिक यांची सुरक्षाविषयक बैठक घेऊन त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात यावे स्थानिक पोलीस प्रशासन व सराफ बांधव यांचा समन्वय साधण्यासाठी पोलीस मित्र या नावाने अधिकृत व्हाट्सअप ग्रुप स्थापन करण्यात यावा जेणेकरून तातडीची माहिती देवाण-घेवाण व सुरक्षा नियोजन सुलभ होईल सराफ बाजार व प्रमुख व्यापारी भागात पोलीस गस्त वाढवण्यात यावी दर दोन महिन्यांनी पोलीस अधिकारी व सराफ बांधव यांची संयुक्त बैठक घेऊन सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्यात यावा त्या दरम्यान आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या.
या वेळी बोलताना भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बुराडे म्हणाले की राज्यात गेल्या काही दिवसांपासून सराफ व्यापार्यावर हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत सराफांच्या दुकानातुन तर कधी सराफ घरी जात असताना लुटमार केली जात आहे. आज सोन्याच्या भावाने गगन भरारी घेतली आहे आसे असताना सराफ व्यवसाय करणे अवघड व जिकिरीचे  झाले आहे त्यातच आशा लुटमारीच्या घटनेन सराफ व्यावसायिक त्रस्त झाले आहेत सराफ सुवर्णकारांना संरक्षण देणे हे सरकारचे कर्तव्य आहे त्या साठी सरकारने सराफ सुवर्णकारांना स्वसंरक्षणासाठी बंदुकीचे परवाने देण्यात यावेत.. या वेळी बोलताना सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष उमेशजी बुर्हाडे म्हणाले राज्यात विविध ठिकाणी सराफ व्यवसायिकांवर अशा प्रकारचे हल्ले व लूटमारीच्या घटना घडताना दिसत आहेत गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक उरलेला नाही ही अत्यंत चिंताजनक बाब आहे झालेला प्रकार हा केवळ चोरी करण्याच्या उद्देशाने झाला की जाणीवपूर्वक जीवघेणा हाल्ला करण्याचा प्रयत्न होता याची चौकशी झाली पाहिजेत पोलीस प्रशासन व सराफ सुवर्णकार यांच्यात समन्वय वाढवणे गरजेचे आहे सुरक्षेच्या दृष्टीने प्रभावी पावले उचलली गेल्यास भविष्यात अशा घटना टाळण्यास मोठी मदत होणार आसल्याने प्रशासनाने या गंभीर प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी. आशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष उमेशजी बुर्हाडे यांनी यावेळी व्यक्त केली.    या वेळीभारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष धर्मभुषण काकासाहेब बुराडे सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष उमेशजी बुर्हाडे यांच्या सह पंढरपूर सोनार समाज संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ मंजरतकर संस्था उपाध्यक्ष संजय ढाळे सोनार समाज अध्यक्ष माजी नगरसेवक जगदीश जोजारे सोनार समाज उपाध्यक्ष तथा भारतीय नरहरी सेना महानिरीक्षक लंकेश बुराडे रामचंद्र अष्टेकर सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष गणेश मैड. सराफ सोमनाथ अवताडे औदुंबर कदम सुरज सोलंकर विशाल दहिवाळ पवन ढाळे गौरव कुलथे ओंकार ढाळे, समिती तालुकाप्रमुख संदेश सोनार निखिल दीक्षित अमोल हिलाले प्रशांत पोतदार कैलास दुधाने दीपक अष्टेकर उमेश बागडे सचिन बानकर बालाजी दीक्षित दिलीप शिरवाडकर जयसिंग येवले प्रशांत महामुनी व उदय मंजरतकर आदी सराफ सुवर्णकार बांधव उपस्थित होते

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटची भरारी; फ्रीस्टीन इन्फोटेकमध्ये चार विद्यार्थ्यांची निवड

संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज पंढरपूर : प्रतिनिधी अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि…

3 days ago

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटचा डंका; सानिकाला ९ लाखांचे पॅकेज

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी…

5 days ago

अजितदादांच्या जयंतीनिमित्त अजितदादा सुकन्या योजना राबविणार

लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार - राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम लोकनेते तथा महाराष्ट्राचे…

6 days ago

स्थापत्य अभियांत्रिकी विभागात व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम उत्साहात संपन्न

पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत…

6 days ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूटच्या प्रा. बाबर व प्रा. लंबे यांच्या संशोधनाला भारत सरकारचे पेटंट

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि…

2 weeks ago

पंढरपूर सिंहगडच्या दोन विदयार्थ्यांची स्टर्लिंग अँड विल्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये निवड वार्षिक ५ लाख पॅकेजची नोकरी

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ…

2 weeks ago