कर्मयोगी किड्स फाउंडेशन स्कूलमध्ये आनंद बाजार दिवस अत्यंत उत्साहात साजरा झाला. या बाजारामध्ये नर्सरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
या आनंद बाजारामध्ये सर्व प्रकारच्या पालेभाज्या, विविध प्रकारचे ज्यूस, वेगवेगळ्या प्रकारची खेळणी, सर्व प्रकारची स्टेशनरी, फळे (उदा. पपई, संत्रे, स्ट्रॉबेरी, केळी, पेरू, अननस इ.), विविध फुलझाडे, कप केक, चॉकलेट्स, बिस्किट्स इत्यादी वस्तू मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत्या.
लहान लहान मुलांना या बाजारातून खूप आनंद मिळाला. त्यांच्या आवडीच्या सर्व वस्तू या बाजारामध्ये उपलब्ध असल्याने मुलांचा उत्साह विशेष दिसून आला.हा बाजार भरविण्यामागे शाळेचा उद्देश फक्त हाच होता की, मुलांना व्यवहारज्ञान मिळावे तसेच पैशांची देवाण-घेवाण कशी करावी हे प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पालकांशी संवाद साधता यावा.हा आनंद बाजार यशस्वी होण्यासाठी मुलांचा, पालकांचा तसेच शिक्षकांचा मोठा सहभाग लाभला. लहान मुलांनी व पालकांनी खूप मोलाची साथ दिली. त्यामुळे हा आनंद बाजार दिवस आनंदाने, उत्साहाने आणि यशस्वीरीत्या पार पडला.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…