Categories: Uncategorized

कर्मयोगी किड्स फाउंडेशन” स्कूलच्या विद्यार्थ्यांची माऊली फार्म हाऊस, भंडीशेगाव येथे शैक्षणिक भेट

आज दिनांक 12/01/2026 रोजी कर्मयोगी किड्स फाउंडेशन स्कूलच्या विद्यार्थ्यांनी माऊली फार्म हाऊस, भंडीशेगाव येथे शैक्षणिक भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मानसी दास, तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी आदरणीय श्री. राजकुमार कोथमिरे साहेब यांच्या फार्म हाऊसला भेट दिली. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आंबा, चिंच, चिकू, गुलाब इत्यादी विविध झाडे तसेच त्यांचे निवासस्थान पाहिले. फार्म हाऊसचा परिसर अतिशय स्वच्छ, सुंदर व निसर्गरम्य होता.
विद्यार्थ्यांनी निसर्गाच्या सानिध्यात मनसोक्त वनभोजनाचा आनंद घेतला. विविध खेळ, नृत्य यामध्ये सहभागी होत त्यांनी आनंद व्यक्त केला. या भेटीत विद्यार्थ्यांना विविध वृक्षांची माहिती मिळाली तसेच शेतीविषयक ज्ञान व पारंपरिक जीवनशैलीची ओळख झाली.
आदरणीय श्री. राजकुमार कोथमिरे साहेब यांनी विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी फार्म हाऊस उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मानसी दास यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

11 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago