ताज्याघडामोडी

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे जावा प्रोग्रॅमिंग व पायथॉन प्रशिक्षण यशस्वीरीत्या संपन्न

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे तृतीय वर्षातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी १२ डिसेंबर २०२५ ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीत “जावा प्रोग्रॅमिंग व पायथॉन प्रोग्रॅमिंग” या विषयांवर विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचे यशस्वी संचालन श्री. राहुल घोष व श्री. नारायण ठाकरे यांनी केले.
सध्याच्या तंत्रज्ञानप्रधान युगात जावा व पायथॉन प्रोग्रॅमिंग ही कौशल्ये उद्योगक्षेत्रासाठी अत्यंत आवश्यक व मागणी असलेली ठरली आहेत. विशेषतः सॉफ्टवेअर विकास, डेटा अ‍ॅनालिटिक्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, वेब डेव्हलपमेंट व ऑटोमेशन यांसारख्या क्षेत्रांमध्ये पायथॉनचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना उद्योगजगतातील अद्ययावत तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.
या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांना कोअर जावा, अ‍ॅडव्हान्सड जावा, विविध फ्रेमवर्क्स, तसेच पायथॉन प्रोग्रॅमिंगमधील मूलभूत संकल्पना, प्रोग्रॅमिंग लॉजिक, रिअल टाइम अ‍ॅप्लिकेशन्स व प्रात्यक्षिके यांचे सखोल ज्ञान देण्यात आले. हे प्रशिक्षण क्यूस्पायडर कंपनीच्या सहकार्याने राबविण्यात आले. तृतीय वर्षातील २३०विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदविला.
या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे तांत्रिक व व्यावसायिक कौशल्य अधिक सक्षम झाले असून त्यांना कॅम्पस प्लेसमेंटसाठी आत्मविश्वास मिळाला आहे. सोलापूर जिल्ह्यात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी कॉग्निझंट, एलटीआय माईंडट्री यांसारख्या नामांकित कंपन्या कॅम्पस प्लेसमेंटसाठी केवळ सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठीच सप्टेंबर महिन्यात उपलब्ध झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जावा व पायथॉन प्रोग्रॅमिंगचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी आशा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी व्यक्त केली.
हे प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

40 minutes ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago