Categories: Uncategorized

मराठी पत्रकार संघाच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी एकमतचे सर्वगोड तर तालुकाध्यक्षपदी पुण्यनगरीचे यादव यांची निवड

मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य सचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी मराठी पत्रकार संघाच्या नूतन पंढरपूर कार्यकारणी निवडीबाबत येथील पत्रकार भवन येथे बैठक पार पडली. यामध्ये मराठी पत्रकार संघाच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी दैनिक एकमतचे तालुका प्रतिनिधी अपराजित सर्वगोड तर तालुका अध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे मिलिंद यादव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेचयाप्रसंगी पत्रकारांच्या मराठी पत्रकार संघाच्या विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी पंढरपूर येथे उभारण्यात येणाऱ्या मीडिया टावर बाबत तसेच विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. मराठी पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारणी मध्ये शहर उपाध्यक्ष अमोल माने, दगडु कांबळे, शहर सचिव दत्ता पाटील, शहर कार्याध्यक्ष रामकृष्ण बिडकर, शहर खजिनदार सचिन माने, शहर प्रसिद्धी प्रमुख कबिर देवकुळे यांची निवड करण्यात आली तर पंढरपूर तालुका उपाध्यक्ष बालम मुलानी, तालुका कार्याध्यक्ष अमोल कुलकर्णी, तालुका सचिव अरुण जाधव, तालुका खजिनदार सावता जाधव, तालुका प्रसिद्धीप्रमुख विनोद पोतदार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ शहापूरकर, पत्रकार कल्याण कुलकर्णी, विकास पवार, संजय कोकरे, राजेंद्र ढवळे, सागर आतकरे, नवनाथ खिलारे, अमोल गुरव, नेताजी शिंदे, संतोष चंदनशिवे, प्रकाश सरताळे, संतोष कसगावडे, संजय यादव, प्रदीप आसबे यांच्यासह मराठी पत्रकार संघाचे पत्रकार बांधव उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

11 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago