लाईफलाईन हॉस्पिटल येथे कॅन्सरसह विविध गंभीर आजारावर शस्त्रक्रियांची सोय
डॉ. शैलेश पुणतांबेकर हे पुण्यातील एक प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक कॅन्सर सर्जन आहेत. गर्भाशयाच्या ग्रीवेच्या कर्करोगासाठी रॅडिकल हिस्टेरेक्टॉमीची त्यांची तंत्रे एका प्रतिष्ठित अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित झाली आणि ती “पुणे तंत्र” म्हणून ओळखली जाऊ लागली. आज, ही तंत्रे ४० हून अधिक देशांमध्ये वापरली जातात.डॉ. पुणतांबेकर यांनी भारतातील आघाडीच्या कर्करोग संस्थांमध्ये – किडवाई (बंगळुरू), आरजीसीआयआरसी (दिल्ली), जीसीआरआय (गुजरात), अड्यार (चेन्नई), गुवाहाटी कर्करोग केंद्र, ग्वाल्हेर कर्करोग केंद्र आणि इतर – सर्जनना प्रशिक्षण दिले आहे.तर गर्भाशय प्रत्यारोपणा सारख्या किचकट त्यांनी आठ वर्षांपासून यशस्वी करीत आले आहेत.त्याच बरोबर शरीरातील ब्रेन कॅन्सर वगळता इतर सर्वच प्रकारच्या कॅन्सरवर रोबोटिक तसेच लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया करण्यात डॉ.शैलेश पुणतांबेकर यांचा मोठा हातखंडा असून यामुळे महिन्यातील अनेक दिवस ते विविध देशातील विविध शहरात नामवंत हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया करण्यासाठी जात आले आहेत.
पंढरपुरतील अत्याधुनिक सुविधा आणि उपचार पद्धतीने परिपूर्ण समजल्या जाणाऱ्या लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आता प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी व रविवारी डॉ.शैलेश पुणतांबेकर हे उपलब्ध असणार आहेत.रविवार ७ डिसेंबर रोजी लाईफलाईन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे त्यांनी एका थायरॉइडच्या रुग्णावर गळ्यावर कुठलाही सर्जरी कट न घेता दुर्बिणीतून रोबोटिक शास्त्रकिया यशस्वी रित्या पार पाडली असून या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून जवळपास १ ते दीड किलो वजनाचा अतिरिक्त भाग रिमूव्ह करण्यात आला आहे.आज हि यशस्वी शस्त्रकिया पार पाडल्यानंतर तसेच लाईफलाईन हॉस्पटिल येथे माध्यमांशी संवाद साधत सविस्तर माहिती दिली
संशोधनातून भारताला विकसित देश बनवा- डॉ. परिक्षित महाल्ले, पुणे एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ…
पंढरपूर - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षण…
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन…
पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा 'माजी विद्यार्थी मेळावा' आणि ‘पदवीप्रदान समारंभ’ स्वेरी कॉलेज कॅम्पस मध्ये येत्या…
पंढरपूर सिंहगडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन: पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…
दिल्ली येथील मान्यवरांची उपस्थिती राहणार पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस)…