ताज्याघडामोडी

येत्या शनिवारी स्वेरीत माजी विद्यार्थी मेळावा आणि पदवीप्रदान समारंभ

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा माजी विद्यार्थी मेळावा‘ आणि पदवीप्रदान समारंभ’ स्वेरी कॉलेज कॅम्पस मध्ये येत्या शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.’ अशी माहिती स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.

         दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगपंढरपूरचा माजी विद्यार्थी मेळावा‘ व पदवीप्रदान समारंभ’ आयोजित करण्यात आलेला आहे. या माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी स्वेरीच्या स्थापने पासूनच्या पहिल्या बॅच पासून पुढील सर्व विद्यार्थ्यांना आमंत्रित केले आहे. तर पदवीप्रदान समारंभ’ करिता मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आमंत्रित केले आहे. या निमित्ताने माजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या प्राध्यापकांसोबत तसेच इतर विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधता येणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून माजी विद्यार्थी हे त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. या कार्यक्रमासाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी व मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी यासाठी उपस्थित रहावे.‘ असे आवाहन माजी विद्यार्थी संघटनाआणि स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीने करण्यात आले आहे. माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष गुरुप्रसाद तेलकरउपाध्यक्ष दत्तात्रय घोडकेसचिव डॉ.करण पाटील आणि स्वेरीचे प्राध्यापक वर्ग हे या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली या माजी विद्यार्थी मेळाव्याची व पदवीप्रदान समारंभाची तयारी अंतिम टप्यात आली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

56 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago