ताज्याघडामोडी

स्वेरीमध्ये मंगळवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरचे उदघाटन

दिल्ली येथील मान्यवरांची उपस्थिती राहणार

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये उद्या (मंगळवार) दि. ०९ डिसेंबर २०२५ रोजी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर (एसीआयसी) चे उदघाटन होणार आहे अशी माहिती संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांनी दिली.

         मंगळवार, दि. ०९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ०८:१५ वाजता स्वेरी कॅम्पस मध्ये अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर (एसीआयसी) चे उदघाटन होणार आहे. यासाठी अटल इनोव्हेशन मिशन कार्यक्रम प्रमुख प्रतीक देशमुख, अटल इनोव्हेशन मिशनचे नावीन्यपूर्ण उपक्रम प्रमुख वितस्ता तिवारी तसेच व्हील्स ग्लोबल फाउंडेशनचे महेश वैद्य आणि सौ. सुजाता नरसिंहन हया देखील या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे असणार आहेत तर सोबस इनसाईट फोरमचे दिग्विजय चौधरी, अटल इनोव्हेशन मिशनचे दीपाक्षी जिंदाल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदरचे केंद्र हे अटल इनोव्हेशन मिशन (एआयएम), निती आयोग, भारत सरकार समर्थित आहे. तरी या अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरच्या उदघाटन कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. याद्वारे उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सुविधा व विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. हा संशोधन आणि विकासाचा एक भाग आहे. यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. हर्षवर्धन रोंगे हे काम पाहत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

2 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

7 days ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago