ताज्याघडामोडी

कर्मयोगी बी एस्सी नर्सिंग

महाविद्यालयाचा ८६.२९ टक्के निकाल
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,नाशिक यांच्याकडून घेण्यात आलेल्या प्रथम वर्षाच्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेमध्ये श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग (बी.एस्सी) पंढरपूर महाविद्यालयाचा निकाल ८६.२९% इतका लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक कावरे आश्लेषा, द्वितीय क्रमांक चौधरी अविष्कार, व तृतीय क्रमांक पवार दिपाली यांनी मिळवला आहे.
याबद्दल अधिक माहिती देताना नर्सिंग महाविद्यालयाचे प्रा. गुरुराज कुलकर्णी म्हणाले की कर्मयोगी बी एस्सी नर्सिंग महाविद्यालयाने प्रथम वर्षात द्वितीय सेमिस्टर मध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.सुसज्ज लॅब, तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग, अत्याधुनिक मशिन्स व विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात येणारा नियमित अभ्यास हेच या यशा मागचे गमक आहे असे सांगून त्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक,कर्मयोगी इंजिनिअरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. पी. पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक प्राचार्य डॉ. ए बी कणसे, कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चे प्राचार्य प्रा.गुरुराज कुलकर्णी , कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस एम जाधव, रजिस्ट्रार गणेश वाळके तसेच सर्व प्राध्यापक यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

संभाजी शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समिती सदस्यपदी निवड

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख व पंचायत समितीचे माजी सदस्य, श्री विठ्ठल…

7 days ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

पर्यावरण संरक्षणसाठी संबोधनासह केले विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ…

1 week ago

एसकेएन सिंहगडच्या विद्यार्थिनीचे जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश

कु. सोनिया नवले यांची अमेरिकेतील जागतिक कीर्तीच्या इलिनॉईस विद्यापीठातून एम.एस. पदवी संपादन एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाची उज्जल यशाची परंपरा कायम.

प्रथम वर्ष च्या निकालामध्ये जिल्ह्यात अव्वल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या…

1 month ago

पंढरपूर शहर तालुक्यातील शासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी

संभाजी ब्रिगेडची प्रांताधिकारी पंढरपूर यांच्याकडे निवेदन देत मागणी    स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती…

1 month ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा ९२%निकाल

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या कडून घेण्यात आलेल्या बी.एस्सी नर्सिंगच्या हिवाळी २०२५ परीक्षेत कर्मयोगी…

2 months ago