ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांची आंतर महाविद्यालयीन रायफल शूटिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी

पंढरपूर (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे यांच्या अंतर्गत आयोजित अंतरमहाविद्यालयीन विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी विद्यापीठाचे मुख्य क्रीडा समन्वयक डॉ. शिवाजी कराड व बालाजी पुलाचवाड सर यांनी कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ला दिली. या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या असून महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांमधून स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

स्पर्धेचे उद्घाटन डॉ. रमेश सिद यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेत कर्मयोगीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यामध्ये वैष्णवी खटावकर हिने प्रथम क्रमांक, तर आदित्य सदेवाले याने द्वितीय क्रमांक पटकावला.
रायफल शूटिंगच्या दुसऱ्या प्रकारात वैष्णवी तांबोळी हिने प्रथम क्रमांक तर प्रतीक्षा कोपनर हिने द्वितीय क्रमांक मिळवला.

या सर्व खेळाडूंना प्रा. गणेश बागल व प्रा.आकाश गुजरे यांचे कुशल मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी आयोजनामुळे कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे नाव क्रीडा क्षेत्रात आणखी उज्ज्वल झाले आहे.
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, कर्मयोगी इन्स्टिट्यूट चे प्राचार्य डॉ.एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ.ए बी कणसे, रजिस्ट्रार गणेश वाळके, उपप्राचार्य प्रा. जगदीश मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. राहुल पांचाळ, विभागप्रमुख डॉ.एस एम लंबे, डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले तसेच सर्व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सदर स्पर्धा आर्यमान शूटिंग क्लब पिलीव येथे संपन्न झाल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

2 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago