ताज्याघडामोडी

इलेक्ट्रा 2K25 सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात तंत्रज्ञान आणि नवप्रवर्तनाचा संगम !

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन (EESA) आणि IEEE स्टुडंट ब्रँच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इलेक्ट्रा 2K25 या वार्षिक तांत्रिक महोत्सवाचे भव्य आयोजन विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात आणि ऊर्जा भरलेल्या वातावरणात यशस्वीरित्या पार पडले.
या कार्यक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्यांचा विकास, नेतृत्व क्षमता, सामूहिक कार्यसंस्कृती आणि नवोन्मेषी विचारसरणीला चालना देणे हे होते. महोत्सवामध्ये विविध स्पर्धा, कार्यशाळा व सादरीकरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा सादर करण्याची अनोखी संधी मिळाली.

कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ नवउद्योजक श्री. सागर एस. जगताप (संस्थापक, विराट लिफ्ट्स प्रा. लि.), उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, आणि विभागप्रमुख डॉ. के. शिवशंकर यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलनाने संपन्न झाला. उद्घाटनप्रसंगी बोलताना श्री. सागर जगताप म्हणाले: “विद्यार्थ्यांना नवकल्पना मांडण्याची, आपली व्यावसायिक क्षमता सिद्ध करण्याची ही एक उत्तम संधी आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, संघभावना आणि नेतृत्वगुण वृद्धिंगत होतात.”

या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. के. शिवशंकर (विभागप्रमुख व IEEE काउन्सेलर), प्राचार्य डॉ. के. जे. करांडे (IEEE ब्रँच मेंटर) आणि डॉ. एस. जी. कुलकर्णी (IIC अध्यक्ष व उपप्राचार्य) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. प्रा. पी. बी. व्यवहारे व प्रा. ए. आर. मासाळ यांनी संयोजनाची जबाबदारी पार पाडली. विद्यार्थी समन्वयक आकाश चौगुले आणि यश पवार यांनी कार्यक्रम व्यवस्थापनात विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रतीक फुंदे आणि प्राप्ती खळगे यांनी केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील ४३० हून अधिक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या ज्ञान, सर्जनशीलता, वक्तृत्व कौशल्य आणि गेमिंग स्किल्स यांची उजळ झलक या स्पर्धांमधून दिसून आली.

या तांत्रिक महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धेचे नियोजन केले गेले त्यामध्ये विजेता व उपविजेता ठरलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे : क्विझ स्पर्धा – विजेता: शुभम ताठे, उपविजेती: गौरी कोरके, पझल बोर्ड- विजेता: अनिष्का राऊत, उपविजेता: अर्जुन नायकु, मोबाईल गेम – Free Fire – विजेते: गणेश कुंभार, आर्यन चापके, प्रतीक चव्हाण, प्रेम शिंदे, उपविजेते: आशिष गायकवाड, सुदर्शन नवले, विराज चव्हाण, सूरज खाडे, BGMI स्पर्धा- विजेते: अथर्व मोहिते, जयेश भोसले, यशराज लाडे, सुयश फडके, उपविजेते: ओंकार माळी, तन्मय सुदाके, मयूर चव्हाण, आदर्श गायकवाड, लुडो स्पर्धा- विजेता: अर्जुन होनकळस, उपविजेती: सुकन्या शिंदे, व्हिडीओग्राफी स्पर्धा- विजेते: वाळूजकर, करण गांजले, उपविजेते: धीरज गायकवाड, गणेश लोहार इ. विद्यार्थ्यांनी वरीलस्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले. ‘इलेक्ट्रा-2K25’ हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ मनोरंजन आणि स्पर्धा न ठरता, ज्ञानवर्धन, कौशल्यविकास, आणि व्यक्तिमत्व विकासाचा एक प्रेरणादायी आणि संस्मरणीय अनुभव ठरला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्युत अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व स्वयंसेवक विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

58 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago