ताज्याघडामोडी

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यश चव्हाणची ऑल इंडिया बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड – महाविद्यालयाचा अभिमान!

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथील द्वितीय वर्ष यांत्रिकी अभियांत्रिकी विभागाचा कु. यश सतीश चव्हाण याने आपल्या अफाट मेहनत, जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2025 हरियाणा येथे होणा-या बॉक्सिंग स्पर्धेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर मार्फत अंतिम निवड मिळवली आहे.

दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, अंतर्गत बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय, अनगर येथे पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धेत, यशने 54 किलो वजन गटात सलग दुसऱ्या वर्षी सुवर्णपदक पटकावून आपली विजयी परंपरा कायम राखली आहे.
या उल्लेखनीय यशासाठी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, तसेच यांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी यशचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे. त्याच्या यशामागे प्रशिक्षक माधव शेरेकर व क्रीडा संचालक प्रा. अनिल जाधव यांचे प्रभावी मार्गदर्शन लाभले.महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी यशवर अभिनंदनाचा वर्षाव करत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटची भरारी; फ्रीस्टीन इन्फोटेकमध्ये चार विद्यार्थ्यांची निवड

संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज पंढरपूर : प्रतिनिधी अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि…

3 days ago

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटचा डंका; सानिकाला ९ लाखांचे पॅकेज

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी…

5 days ago

अजितदादांच्या जयंतीनिमित्त अजितदादा सुकन्या योजना राबविणार

लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार - राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम लोकनेते तथा महाराष्ट्राचे…

6 days ago

स्थापत्य अभियांत्रिकी विभागात व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम उत्साहात संपन्न

पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत…

6 days ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूटच्या प्रा. बाबर व प्रा. लंबे यांच्या संशोधनाला भारत सरकारचे पेटंट

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि…

2 weeks ago

पंढरपूर सिंहगडच्या दोन विदयार्थ्यांची स्टर्लिंग अँड विल्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये निवड वार्षिक ५ लाख पॅकेजची नोकरी

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ…

2 weeks ago