Categories: Uncategorized

संपूर्ण कर्जमाफीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पंढरपुरात बुधवारी शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन

अतिवृष्टीग्रस्त भंडीशेगाव सर्कलसह अनेक गावे पंचनाम्यातून वगळल्याने प्रचंड नाराजी 

पंढरपूर तहसील कार्यालयात निवेदन देत वेधणार शासनाचे लक्ष
सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टीमुळे तसेच वारंवार आलेल्या पुराचा मोठा फटका बसला आहे.पिकांचे मोठे नुकसान झाले आहे,सतत होणाऱ्या  अतिवृष्टीमुळं होत्याचे नव्हते झाले आहे.पंढरपूर तालुक्यातही अतिवृष्टीमुळे द्राक्ष,डाळींब,केळी बागा तसेच इतरही अनेक भुसार पिके उध्वस्त झाले आहेत.मात्र २४ तासात ६५ मिलीमीटर पावसाच्या निकषामुळे भरपाई मिळण्यापासून शेतकरी वंचित राहण्याचा धोका उत्पन्न झाला आहे.पंढरपूर तालुक्यातील भाळवणी भागात मागील तीन महिने सातत्याने धोधो पाऊस पडला असून अनेक वेळा ओढे नाले भरून वाहिले आहेत.अनेक रस्ते बंद झाल्याचे दिसून आले आहे.मात्र तरीही भाळवणी परिसरात पंचनामे करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा अनुभव या भागातील अनेक शेतकऱ्यांना येऊ लागला आहे. 
सोलापूर जिल्ह्यात सीना नदीकाठ व भीमा नदी काठच्या शेतकऱ्यांना वारंवार पुराचा फटका बसला आहे.नदीकाठच्या परिसरात ऊस पिकाचे पाणी साठून कुजून नुकसान झाले आहे.तर अनेक पिके नष्ट झाली आहेत. पिके, घरे, पशुधन तर गेलेच आहे, पण जमीन साफ खरवडून गेली आहे.आणि या साऱ्या संकटातून शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना भरीव मदत करणे गरजेचे झाले आहे. केंद्र सरकारने स्वतंत्र रित्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत केली पाहिजे तर राज्य सरकारने निवडणुकीवेळी दिलेला शब्द पाळत कर्जमाफी केली पाहिजे तसेच मागील तीन महिन्यात झालेल्या सतत अतिवृष्टीमुळे भाळवणी तसेच भंडीशेगाव सर्कल तसेच तालुक्यातील इतरही गावे नुकसानीच्या पंचनाम्यापासून वंचित आहेत तेथे त्वरित पंचनामे करावेत  या मागणीसाठी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर बुधवार दिनांक ८ रोजी सकाळी ११ वाजता उग्र निदर्शने करून निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिली आहे.  तसेच भंडीशेगाव सर्कल मधील सर्व अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी केले आहे 
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

स्वेरीमध्ये ‘नॅशनल एज्युकेशन डे’ उत्साहात साजरा

पंढरपूर - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षण…

3 days ago

पंढरपुरात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रोबोटिक,लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.शैलेश पुणतांबेकर यांची सेवा उपलब्ध

लाईफलाईन हॉस्पिटल येथे कॅन्सरसह विविध गंभीर आजारावर शस्त्रक्रियांची सोय डॉ. शैलेश पुणतांबेकर हे पुण्यातील एक…

7 days ago

स्वेरीमध्ये अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरसाठी नीति आयोगाबरोबर सामंजस्य करार

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन…

1 week ago

येत्या शनिवारी स्वेरीत माजी विद्यार्थी मेळावा आणि पदवीप्रदान समारंभ

पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा 'माजी विद्यार्थी मेळावा' आणि ‘पदवीप्रदान समारंभ’ स्वेरी कॉलेज कॅम्पस मध्ये येत्या…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता व व्हिजन तंत्रज्ञानावर चर्चा

पंढरपूर सिंहगडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन: पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago