ताज्याघडामोडी

संसार अतिवृष्टीमुळे पुरात वाहून गेलेला पण राष्ट्रवादीच्या श्रीकांत शिंदे यांनी दिला मदतीचा हात

माढा तालुक्यातील उदंरगाव येथे दिला मदतीचा हात

पंढरपूर –                                                                                                                 सीना नदीच्या महापुरात अनेकांचे नुकसान झाले, शेतकऱ्यांचे तर आतोनात नुकसान झाले, घरात जे जे होते ते माती मोल झाले, रातोरात होत्याच नव्हते होऊन गेले, सोशल मीडियावर अनेक निराधार महिलांच्या व वेदना पाहून एक मदतीसाठी हाक देत असताना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी ही असाच एक व्हायरल व्हीडीओ पाहिल्यानंतर त्यांचे ही मन रहावले नाही. त्यामुळे कायम प्रत्येकाला मदतीला धावून जाणारे एक माणुसकी जपणारा व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते त्यातूनच त्यांनी माढा तालुक्यातील उदंरगाव येथील संगीता शिंदे व कमल शिंदे यांना कोणाचाही आधार नाही, घरात पुरुष माणूस कोणी नाही होता तो संसार उध्वस्त झाला हे पाहून त्यांनी त्या दोन महिलांना पूर्ण भांडी त्यामध्ये ताट,वाटी,फुलपात्र,तांबे, परात,तवा, कढई, डबे,सतरंजी,प्रत्येकी 5 नग व चादर, साड्या,देवून एवढच नाही तर किराणा ही माल भरून दिला त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यतील धोंडेवाडी येथील एका निराधार महिलेला रोख पाच हजार रुपये व किराणा साहित्य दिले त्यामुळे नेहमीच इतर विविध उपक्रम राबविणारे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी अडचणीत असलेल्या महिलांना एक मदतीचा हात दिलेला आहे.
याबाबत श्रीकांत शिंदे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार साहेब कायम सांगतात की, अडचणीच्या काळात प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणे हे आवश्यक आहे अन् हे आपल्या कार्यकर्त्यांनी आत्मसात केले पाहिजे हे तत्व मनाशी ठरवून कायम अडचणीच्या वेळी मदत करण्याचा प्रामाणिक हेतू असतो  त्यामुळेच त्यातून आपण ही काही तरी मदत करावी ही भावना निर्माण झाली आणि त्यातूनच ही एक मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

22 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago