शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत माढा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांनी एका दिवसात ७ लाख २२ हजार ११ रूपये जमा केले. जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी जमा झालेल्या निधीचे चेक कुर्डूवाडी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांच्याकडे गटशिक्षणाधिकारी विकास यादव व सर्व शिक्षक संघटनांचे राज्य, जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी माढा तालुक्यातील शिक्षक सर्वप्रथम धावून आल्याचे यावेळी दिसून आले. यावेळी वरवडे केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गायकवाड वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांनी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोडनिंब क्रमांक १ येथील विद्यार्थी ज्ञानेश रविंद्र देबडवार याने खाऊ साठी जमा केलेले गल्ल्यातील पैसे जिल्हाधिकारी यांच्याकडे पुरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी जमा केले. त्यांचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कौतुक केले. माढा तालुक्यातील सर्व शिक्षक, शिक्षक संघटना समन्वय समिती, माढा तालुका प्राथमिक शिक्षक पतपेढी, पुरोगामी शिक्षक पतसंस्था, विठ्ठलराव शिंदे शिक्षक पतसंस्था व संजयमामा शिंदे शिक्षक पतसंस्था यांच्याकडून पुरग्रस्तांच्या मदतीसाठी ७ लाख २२ हजार ११ रुपयांची निधी देण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव यांनी सांगितले व पुरग्रस्त अन्नदाता शेतकरी बांधवांना संकटकाळात मदत केल्याबद्दल सर्व शिक्षकांचे त्यांनी आभार मानले.
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केलेल्या आवाहनानुसार तालुक्यातील प्राथमिक शिक्षक आपला एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत. तसेच पुरग्रस्त भागातील बाधीत शाळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने त्या उभ्या करण्यासाठी पायाभूत सुविधांसाठी आणखी मदत करणार असल्याचे प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
संशोधनातून भारताला विकसित देश बनवा- डॉ. परिक्षित महाल्ले, पुणे एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ…
पंढरपूर - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षण…
लाईफलाईन हॉस्पिटल येथे कॅन्सरसह विविध गंभीर आजारावर शस्त्रक्रियांची सोय डॉ. शैलेश पुणतांबेकर हे पुण्यातील एक…
पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन…
पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा 'माजी विद्यार्थी मेळावा' आणि ‘पदवीप्रदान समारंभ’ स्वेरी कॉलेज कॅम्पस मध्ये येत्या…
पंढरपूर सिंहगडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन: पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…