ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिटयूट मध्ये “टेक्नोस्पार्क” स्पर्धा उत्सहात संपन्न

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग, आय आय सी, आयक्यूएसी व परम एक्सेस विभागा मार्फत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी टेक्नोस्पार्क या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये मॉक इंटरव्यू व आयडिया प्रेसेंटेशन च्या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून कम्प्युटर सायन्स विभागाचे माजी विद्यार्थी रोहित कांबळे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील व प्रमुख पाहुणे रोहित कांबळे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अभियंता दिनाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे २८९ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता अशी माहिती कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा. दीपक भोसले यांनी दिली.

सदर स्पर्धेमध्ये आयडिया प्रेझेंटेशन स्पर्धेसाठी हरी शेळके, अक्षदा हलकुडे, अंकिता जाधव तर मॉक कॅम्पस इंटरव्यू स्पर्धेमध्ये अक्षय कोरके व सुप्रिया सुरनर या विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. प्रा.गायत्री सरदेशमुख यांनी स्पर्धेचे संयोजक म्हणून काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कम्प्युटर सायन्स विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील कर्मयोगी पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, उपप्राचार्य जे एल मुडेगावकर, रजिस्ट्रार जी डी वाळके, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. राहुल पांचाळ, विभाग प्रमुख डॉ. एस एम लंबे, डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा. अनिल बाबर प्रा. दीपक भोसले तसेच इतर सर्व प्राध्यापक उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस पी पाटील यांनी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले व स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. प्रा. दीपक भोसले यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

4 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago