ताज्याघडामोडी

“स्वच्छता ही सेवा” अभियानांतर्गत सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रस्वच्छता अभियान

“एक दिन, एक घंटा, एक साथ” उपक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पंढरपूर प्रतिनिधी :
भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, तसेच महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छता ही सेवा” अभियान २०२५ अंतर्गत राष्ट्र स्वच्छता अभियानाचे आयोजन एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे करण्यात आले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलाश करांडे यांनी दिली.
ही स्वच्छता मोहिम पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त, दि. २५ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता, “एक दिन, एक घंटा, एक साथ” या संकल्पनेखाली राबवण्यात आली. या उपक्रमात महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत राष्ट्र स्वच्छतेची शपथ घेतली.
कार्यक्रमाबाबत माहिती देताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे म्हणाले की, “स्वच्छ भारताच्या दिशेने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उचललेले पाऊल अत्यंत प्रेरणादायी आहे.”
या कार्यक्रमात माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. चंद्रकांत पाटील यांनी YouTube मार्फत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत स्वच्छतेचा संदेश दिला.
स्वच्छता अभियानाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख यांच्यासह प्रा. सुमित इंगोले, प्रा. गुरुराज इनामदार, प्रा. अजित करांडे, प्रा. अर्जुन मासाळ आणि प्रा. सिध्देश्वर गणगोंडा यांनी विशेष योगदान दिले. एनएसएस स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी पूर्ण उत्साहाने सहभाग घेत परिसरात स्वच्छता अभियान राबवले.
हा उपक्रम स्वच्छतेविषयी जनजागृती घडवून आणणारा आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणारा ठरला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

4 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago