ताज्याघडामोडी

महाराष्ट्र उद्योजक गौरव पुरस्कार मनसे नेते दिलीप धोत्रे यांना जाहीर

रविवारी पुणे येथे बिझनेस आयकॉन ऑफ द इयर पुरस्काराने दिलीप धोत्रे यांचा होणार सन्मान

पंढरपूर : प्रतिनिधी

यंदाचा महाराष्ट्र उद्योजक गौरव पुरस्कार धोत्रेज ग्रँड उद्योग समूहाचे प्रमुख दिलीप धोत्रे यांना नुकताच जाहीर झाला असून रविवारी पुणे येथे शिवर्पण चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने बिझनेस आयकॉन ऑफ द इयर पुरस्काराने सिने अभिनेत्या वर्षा उसगावकर यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दिलीप धोत्रे यांना गौरवण्यात येणार आहे. अल्पावधीत धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड व मनसे ॲग्रो इंडस्ट्रीजने घेतलेल्या गरुड भरारीमुळे आणि उद्योग समूहाचे प्रमुख दिलीप धोत्रे यांनी केलेल्या कार्याचे दखल घेऊन त्यांना नुकताच शिवर्पण चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा यंदाचा महाराष्ट्र उद्योजक गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.
दिलीप धोत्रे यांनी ग्रँड पंचतारांकित हॉटेल, ग्रँड ट्रॅक्टर्स, पेट्रोल पंप, डी डी इन्फ्रा, विठाई अर्बन निधी बँक, मनसे ऍग्रो इंडस्ट्रिज या सह विविध उद्योगाच्या माध्यमातून शेकडो बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तसेच महिला सक्षमीकरणासाठी लघुउद्योगांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्यांचे सामाजिक कार्यातही मोठे योगदान दिले आहे. याची दखल घेऊन रविवारी पुणे येथे त्यांचा बिजनेस आयकॉन ऑफ द इयर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago