ताज्याघडामोडी

नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांची बैठक संपन्न

उत्सव काळात गावात कायदा व सुव्यवस्था राहण्यासाठी पोलीस पाटलांना मार्गदर्शन

पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे आज आगामी साजरी होणाऱ्या नवरात्र उत्सवानिमित्त पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक रेखा घनवट यांनी ग्रामीण भागातील पोलीस पाटलांची व ग्रामीण भागातील नवरात्र उत्सव मंडळाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक रेखा घनवट यांनी मार्गदर्शन केले यावेळी त्यांनी आगामी नवरात्री उत्सव साजरा करताना शांततेचा भंग न करता साजरा करण्याचे आव्हान केले गावातील कायदा सुव्यवस्था व शांतता राहण्यासाठी गावातील पोलीस पाटलांनी व नवरात्र उत्सव मंडळांनी प्रयत्न करावेत अशी सूचना केली नवरात्री उत्सव साजरी करताना विविध सामाजिक उपक्रम राबवावीत यामध्ये लहान मुला मुलींसाठी स्पर्धा आयोजित कराव्यात तसेच वृक्षारोपण करावे अशी सूचना केली नवरात्री उत्सव साजरी करताना जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची नो डीजे नो डॉल्बी नो लाइट्स नो लेजर्स याची पोलीस पाटलांनी व नवरात्र उत्सव मंडळांनी अंमलबजावणी करावी अशी सूचना केली नवरात्री उत्सव साजरा करताना त्या ठिकाणी शक्य असेल तर कॅमेरा व सीसीटीव्ही ची व्यवस्था करावी अशी आव्हान केली शेवटी समारोप करताना दिलेल्या सूचनांचे नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी पालन करावे असे सांगितले या बैठकीसाठी पीएसआय वीरसेन पाटील शेळवे पोलीस पाटील एडवोकेट नवनाथ पाटील जैनवाडी पोलीस पाटील स्मिता दानोळी वाखरीची बाळू शेंडे वाडीकुरोलीचे अमर काळे पाटील पिराची कुरोली शरद कौलगे पाटील सुपली पोलीस पाटील पवार कौठळी पोलीस पाटील माधुरी नागटिळक कोर्टी चे अनिल दगडे लोणारवाडीचे हरीश गंगनमले पाटील भंडीशेगावचे गावचे कस्तुरे पाटील व इतर ग्रामीण भागातील पोलीस पाटील व नवरात्र उत्सवाचे अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago