ताज्याघडामोडी

सिंहगड पंढरपूर महाविद्यालयात महिला विद्यार्थिनींसाठी महिंद्रा प्राईड क्लासरूम प्रशिक्षण यशस्वीरित्या पार

पंढरपूर – सिंहगड इन्स्टिट्यूट, पंढरपूर येथे महिंद्रा प्राईड क्लासरूम आणि नांदी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला विद्यार्थिनींसाठी रोजगारक्षमतेवर आधारित विशेष प्रशिक्षण कार्यक्रम ४ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०२५ दरम्यान यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

या प्रशिक्षणामध्ये एम्पथी, आत्मविश्वास, संप्रेषण कौशल्य, साक्षात्कार, आणि सॉफ्ट स्किल्स यांसारख्या महत्त्वाच्या कौशल्यांवर भर देण्यात आला. प्रशिक्षणाचा उद्देश विद्यार्थिनींना कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हसाठी तयार करणे हा होता. सत्रांचे मार्गदर्शन कुशल प्रशिक्षक आश्विनी टिळक व शिल्पा खुणे यांनी केले. त्यांनी विद्यार्थिनींना केवळ करिअर नव्हे तर एक जबाबदार नागरिक म्हणून घडवण्यासाठी आवश्यक असलेल्या जीवनकौशल्यांची माहिती दिली.

प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थिनींनी रोल प्ले, ग्रुप ॲक्टिव्हिटीज, मॉक इंटरव्ह्यू यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. प्रशिक्षणानंतर अनेक विद्यार्थिनींनी आत्मविश्वास वाढल्याचे व प्लेसमेंटसाठी तयार असल्याचे नमूद केले. महिंद्रा प्राईड क्लासरूम व नांदी फाउंडेशन यांचा हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरला असून त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. या प्रशिक्षणासाठी तृतीय वर्षातील १०० हून अधिक विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवला. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्लेसमेंट ऑफीसर डॉ. समीर कटेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

यशवंतराव चव्हाण (यमाई) तलावात पाणी सोडण्यास सुरुवात

नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांच्या मागणीला यश पंढरपूर : उजणी जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेले…

2 days ago

स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया व आरोग्य तपासणी शिबिर : प्रणव परिचारक

11 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट पर्यंत पंढरपूर तालुक्यात दहा ठिकाणी होणार शिबिर कर्मयोगी श्रद्धेय स्व.…

2 days ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘प्रोटोटाईप/प्रोसेस डिझाईन अँड डेव्हलपमेंट’ विषयावर कार्यशाळा उत्साहात संपन्न.

पंढरपूर | प्रतिनिधी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…

2 days ago

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, कोर्टी येथे विद्युत अभियांत्रिकी विभागाचा पालक मेळावा उत्साहात संपन्न

सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर…

3 days ago

भाजी मंडईतील विक्रेत्यांच्या समस्या जाणून घेत नगराध्यक्षा डॉ.प्राणिताताई भालकेयांची प्रत्यक्ष पाहणी.

पंढरपूर : पंढरपूर शहरातील नवी पेठ भाजी मंडई परिसरात आज पंढरपूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉ.…

4 days ago

शासनांच्या विविध योजना व्याज परतावा योजनांचा लाभ घ्यावा – सौ सुनेत्रताई पवार

रुक्मिणी सहकारी बँकेची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न पंढरपूर येथील रुक्मिणी सहकारी बँकेची ३१…

4 days ago