ताज्याघडामोडी

पालक–शिक्षक संवादातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीला चालना; पंढरपूर सिंहगड मधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात पालक मेळाव्याचे आयोजन

पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहात करण्यात आले, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. या मेळाव्यास विभागातील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

पालक प्रतिनिधी म्हणून श्री. उत्तम सुरवसे यांनी उपस्थित राहून  मार्गदर्शन केले. विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी विभागात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सादर केली. दरम्यान विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.
या पालक-शिक्षक मेळाव्याचे ध्येय म्हणजे विद्यार्थींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पालक, शिक्षक आणि संस्था यांच्यात सशक्त संवाद व सहकार्य निर्माण करणे हे होय. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या वैयक्तिक, सामाजिक व व्यावसायिक विकासाला चालना देणे, घरगुती अभ्यासपद्धती व शिस्तीबाबत चर्चा करणे, तसेच करिअर मार्गदर्शन व नोकरीच्या संधींबाबत माहिती देणे ही उद्दिष्टे यामागे होती.

उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी पालक मेळाव्याचे उद्दिष्ट व उपयुक्तता स्पष्ट केली. तर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रमुख डॉ. समीर कटेकर यांनी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या नोकरीच्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. यशवंत पवार यांनी केले. पालक मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यासाठी डॉ. चेतन पिसे, प्रा. चंद्रकांत देशमुख आणि विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

4 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

1 week ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago