एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे बौद्धिक संपदा हक्क (Intellectual Property Rights – IPR) या विषयावर विद्यार्थ्यांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.या व्याख्यानाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आय.पी.आर विषयी जागरूकता निर्माण करणे, तसेच आजच्या स्पर्धात्मक युगात नाविन्यपूर्ण संकल्पना, संशोधन व शोध यांचे संरक्षण करण्याचे महत्त्व स्पष्ट करणे हा होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. व्ही. एस. बिरादारउपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क आणि बौद्धिक संपदेचे विविध प्रकार यांची सविस्तर माहिती दिली. तसेच पेटंट कसे दाखल करायचे, कोणती प्रक्रिया असते, आवश्यक कागदपत्रे, आणि विविध प्रकारांची उदाहरणे देत अत्यंत समजेल अशा पद्धतीने स्पष्टीकरण करण्यात आले.
डॉ. बिरादार यांनी प्रत्यक्ष उदाहरणे, केस स्टडीजच्या माध्यमातून बौद्धिक संपदेचे व्यावसायीकरण कसे करता येते, संशोधन, नवनिर्मिती व स्टार्टअप्समध्ये याचे महत्त्व काय आहे, हेही स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी भविष्यातील प्रकल्प, संशोधन यामध्ये आय.पी.आर बाबत जागरूक राहण्याचे आणि सृजनशील विचारांची योग्य नोंद ठेवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तर सत्र घेतले गेले, ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी पेटंट नोंदणी प्रक्रिया, कायदेशीर बाबी आणि आय.पी.आर क्षेत्रातील संधी यावर उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारले. विचारलेल्या प्रश्नांचे निरसन उदाहरणांसहित समजावून सांगण्यात आले.विभागप्रमुख डॉ.शिवशंकर कोंडूरु यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. अंजली चांदणे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…