Categories: Uncategorized

पंढरपूर सिंहगडमध्ये “Neural Talk : Future with AI” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन

एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरींग, कोर्टी, पंढरपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागामध्ये Neural Talk : Future with AI” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री. अमेय उत्पात यांची उपस्थिती लाभली. विभागप्रमुख डॉ. ए. ओ. मुलाणी यांनी त्यांचे स्वागत करत त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. यानंतर श्री. उत्पात यांच्या सखोल व माहितीपूर्ण व्याख्यानास सुरुवात झाली.
श्री. अमेय उत्पात यांना उद्योगक्षेत्रात सात वर्षांहून अधिक अनुभव असून त्यांनी Nokia, Accenture, Concentrix Catalyst या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम केले आहे. त्यांनी आपल्या सादरीकरणात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. त्यामध्ये AI मॉडेल्सची रचना प्रक्रिया, AI मॉड्युल डिझाईन, इंजिनीअरची भूमिका, नैतिक मूल्ये तसेच Prompt Engineering याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
यासोबतच, त्यांनी विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी आवश्यक असलेली कौशल्ये, आत्मविश्वास, आणि सतत नविन गोष्टी शिकण्याचे महत्त्व याविषयीही प्रेरणादायी विचार मांडले. कार्यक्रमाच्या शेवटी झालेल्या प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
हे व्याख्यान विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक ज्ञान व उद्योग क्षेत्रातील व्यवहार्य दृष्टीकोन यामधील दुवा निर्माण करणारे ठरले. विभागप्रमुख डॉ. ए. ओ. मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी प्रा. वैष्णवी उत्पात यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

11 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago