पंढरपूर नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन पंढरपूर यांच्या वतीने यंदा “पर्यावरण पूरक गौरी-गणेश सजावट स्पर्धा २०२५” आयोजित करण्यात आली होती. पंढरपूर शहरातील नागरिक, महिला भगिनी, गणेश मंडळे, तसेच विविध सामाजिक संस्थांकडून या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभला.या स्पर्धेमध्ये ११६ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देऊन पारंपरिक पद्धतीने सजावट करण्यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.
स्पर्धेचे मूल्यांकन करण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे व तज्ञ परीक्षकांचे ५ स्वतंत्र मंडळ नेमण्यात आली होती.या परीक्षकांच्या मंडळांनी घरोघरी भेटी देत पर्यावरण पूरक मूर्ती आणि सजावट, प्लास्टिक/थर्माकोल मुक्त सजावट, टाकाऊ पासून टिकाऊ, घरगुती कचरा व्यवस्थापन आणि डस्टबिनचा वापर या आधारे गुणांकन करून परीक्षण केले.
कोल्हापूरच्या ‘माधुरी’ हत्तीणीची कथा, मराठी सण, पांडुरंग भक्त गोरा कुंभाराचा जिवंत देखावा, श्री. विठ्ठल-रुक्मिणी पंढरपूर प्रमुख चार यात्रा पारंपरिक देखावा, केदारेश्वर मंदिर, हरिश्चंद्रगड, गावातील पारंपरिक वाडे, जीवनशैली, चालीरीती व परंपरा, खंडोबा मंदिर, जेजुरी, वृक्षारोपणाचे महत्त्व असे काही उल्लेखनीय आणि सामाजिक संदेश देणारे देखावे ही होते.
या स्तुत्य उपक्रमाच्या यशस्वी आयोजन मुख्याधिकारी महेश रोकडे रामचंद्र बोडरे , नगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळाचे समन्वयक रामचंद्र बोडरे व पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली व सहयोगाने ही स्पर्धा शिस्तबद्धरीत्या पार पडली.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच, विजेत्या स्पर्धकांना ही बक्षीस देण्यासाठी समारंभाचे आयोजन करण्यात येणार असून त्याबाबतची अधिकृत माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल,असे नगरपरिषदेचे उपक्रमशील मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…