ताज्याघडामोडी

स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये ‘अ‍ॅडव्हान्स्ड इंडस्ट्रियल अ‍ॅटोमेशन कंट्रोल’ ही कार्यशाळा संपन्न

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागामार्फत अ‍ॅडव्हान्स्ड इंडस्ट्रियल ऑटोमेशन कंट्रोल’ या विषयावर दि.२२ जुलै २०२५ ते  दि.०२ ऑगस्ट २०२५ अशा तब्बल दोन आठवड्यांची कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

           कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी इंडस्ट्रियल ऑटोमेशन इंडस्ट्रीची रचनाफील्ड डिव्हाइसेसची माहितीकंट्रोलर्सची ओळख तसेच पीएलसी विरुद्ध मायक्रोकंट्रोलर यांची सविस्तर माहिती देण्यात आली. या कार्यशाळेसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंगरूळ (कर्नाटक) मधील इंडवेल ऑटोमेशन कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हिमांशू कुमार हे लाभले होते. या कार्यशाळेत पीएलसी ब्लॉक डायग्रामलॅडेर डायग्राम प्रोग्रॅमिंगकोडेसिस सॉफ्टवेअरचा वापरलॅच-इंटरलॉक-फ्लॅग प्रोग्रॅम्सटायमर व काउंटर बेस्ड प्रोग्रॅम्सपीएलसी आणि जीएक्स सॉफ्टवेअर यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. याशिवाय पीएलसी वायरिंगप्रोजेक्ट डेव्हलपमेंटएचएमआय व स्काडा स्क्रीन मित्सुबिशी डेव्हलपमेंटव्हीएफडीएसी ड्राईव्हचे पॅरामीटर्सएसीडी-डीएसी चे अनुप्रयोग तसेच रिअल-टाईम अप्लिकेशन्स यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सरावसिम्युलेशन व प्रोजेक्ट डेव्हलपमेंट करून तांत्रिक कौशल्य आत्मसात केले. कार्यशाळेचा समारोप क्विझ टेस्ट व प्रमाणपत्र वितरणासह उत्साहात पार पडला. या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल ऑटोमेशन क्षेत्रातील सखोल ज्ञान मिळाले तसेच प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे औद्योगिक कौशल्य विकसित झाले. विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना सदरच्या कार्यशाळेचा फायदा  होणार आहे. ही कार्यशाळा स्वेरीचे संस्थापक व प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखालीकॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार यांच्या सहकार्यानेउपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली. या कार्यशाळेत अंतिम वर्षातील १४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. शशिकांत कांबळे यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन डॉ. एन.पी. कुलकर्णी यांनी केले तर कार्यशाळेचे आभार विभागप्रमुख डॉ. सुमंत आनंद यांनी मानले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago