ताज्याघडामोडी

रात्री जेवून घरात झोपलं 5 जणांचं कुटुंब, सकाळी सगळेच बेशुद्ध, दोघांचा करूण अंत

सोलापूर शहरातील सिव्हील पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इथं एकाच कुटुंबातील पाच जण बेशुद्धावस्थेत आढळले आहेत. या दुर्दैवी घटनेत सहा वर्षांचा मुलगा हर्ष आणि चार वर्षांची मुलगी अक्षरा यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोलापुरातील लष्कर भागात सकाळी 11 च्या सुमारास उघडकीस आली आहे. हे कुटुंब शनिवारी रात्री जेवण करून आपल्या घरात झोपलं होतं. मध्यरात्री खोलीत झालेल्या वायू गळतीमुळे हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील लष्कर परिसरातील बेडरफुलजवळ युवराज मोहन सिंग बलरामवाले (वय ४०) यांचं कुटुंब राहातं. त्यांच्या कुटुंबात पत्नी रंजना (वय ३५), आई विमल (वय ६०), मुलगा हर्ष (वय ६) आणि मुलगी अक्षरा (वय ४) अशा पाच जणांचा समावेश आहे. युवराज बलरामवाले हे गोवंडी म्हणून काम करतात. तर पत्नी रंजना विडी कामगार आहेत. बेडरफुलजवळ त्यांचं दहा बाय पाचचं छोटंसं घर आहे. याच घरात पाच जणांचं कुटुंब राहतं.
घटनेच्या दिवशी शनिवारी रात्री हे कुटुंब रात्री जेवण घरून हवा बंद खोलीत झोपलं होतं. रात्री झोपताना गॅस व्यवस्थित बंद न केल्यामुळे दहा बाय पाचच्या हवा बंद खोलीत वायू गळती झाली, ज्यामुळे संपूर्ण कुटुंब बेशुद्ध झाले. रंजना यांच्यासोबत काम करणाऱ्या महिला विडीचे पत्ते घेण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या असता, त्यांना हे कुटुंब बेशुद्ध अवस्थेत आढळले. यानंतर त्यांनी तत्काळ शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना माहिती दिली आणि सर्वांना सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान हर्ष आणि अक्षरा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.प्राथमिक अंदाजानुसार, गॅस गळतीमुळे गुदमरून हे कुटुंब बेशुद्ध झाले असावे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी सिव्हिल पोलीस चौकीत नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू असून, कुटुंबाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

39 minutes ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 day ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago