न्यु सातारा समूह मुंबई संचलित न्यु सातारा कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग अँड मॅनेजमेंट कोर्टी येथे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व भविष्यातील नोकरीची गरज ओळखून संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 19 ते 20 ऑगस्ट 2025 या दरम्यान 2 दिवसीय ‘व्यक्तिमत्व विकास’ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा मुंबई येथील प्रॉक्टर अँड गॅम्बल प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेतील डिस्ट्रिक्ट मॅनेजर सुरज जवळेकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन दि. 19 ऑगस्ट 2025 रोजी उपस्थित मा. सुरज जवळेकर ,संस्था प्रतिनिधी श्री. ज्ञानेश्वर शेडगे, प्राचार्य विक्रम लोंढे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. विशाल बाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थीत होते. या कार्यशाळेमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील सर्व विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला. या कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर संबंधी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्याच्या अंगी नेतृत्व गुण, पब्लिक स्पिकिंग व आत्मविश्वास कसा वाढवायचा याविषयी माहिती देण्यात आली. आणि कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांकडून काही ॲक्टिवीटिज करून घेत प्रेझेंटेशन स्किल, ग्रुप डिस्कशन व इंटरव्ह्यू टेक्निक्स या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी उपस्थित प्रशिक्षक सुरज जवळेकर सर्व विद्यार्थी यांचे मनःपूर्वक आभार प्रा. विशाल बाड यांनी व्यक्त केले. तसेच ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी सर्व विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…