ताज्याघडामोडी

कर्मयोगी इंस्टिट्यूटच्या धनश्री नाईकनवरे यांची नामांकित कंपनीमध्ये निवड.

इटॉन इंडिया इनोव्हेशन सेंटर मध्ये निवड, मिळाले ९ लाखांचे पॅकेज.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील धनश्री नाईकनवरे या माजी विद्यार्थिनीची इटॉन इंडिया इनोव्हेशन सेंटर, पुणे या नामांकीत कंपनीमध्ये मुलाखती मधून निवड होऊन ९ लाखांचे पॅकेज मिळाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.
पुणे येथील इटॉन इंडिया इनोव्हेशन सेंटर ही एक ऊर्जा व्यवस्थापन कंपनी आहे जी विद्युतीकरण व डिजिटलीकरणाद्वारे जगभरातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी व पर्यावरण संरक्षणाचे काम करते. या कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून धनश्री नाईकनवरे या विद्यार्थिनीला तब्बल ९ लाखांचे पॅकेज मिळाले आहे.
दर वर्षी प्रमाणेच शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ही कर्मयोगीने प्लेसमेंट क्षेत्रामद्धे आपले प्रभुत्व कायम ठेवले आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत दिले जाणारे टेक्निकल, ऍप्टीट्यूड व सॉफ्ट स्किल चे ट्रेनिंग हे कार्पोरेट क्षेत्रात नोकरी लागण्यासाठी अतिशय पूरक व उपयोगी ठरले. तसेच इलेक्ट्रॉनिक अँड टेली कम्युनिकेशनचे विभाग प्रमुख डॉ. एस एम लंबे यांच्या मार्गदर्शनामधून शैक्षणिक वर्षात इ अँड टी सी विभागामध्ये जे वर्कशॉप, सेमिनार व टेक्निकल इव्हेंट्स आयोजित केले गेले त्यामधून मिळालेल्या ज्ञानाचा विशेष उपयोग झाला असल्याचे तिने आवर्जून सांगीतले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. राहुल पांचाळ, विभागप्रमुख डॉ. एस एम लंबे , डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक, विद्यासागर जगताप, प्रा. सुशील कुलकर्णी, प्रा.दत्तात्रय चौगुले, प्रा. योगेश माने व इतर सर्व प्राध्यापक यांनी धनश्री नाईकनवरे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 hour ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago