नक्शा कार्यक्रमांतर्गत नगरपालिका हद्दीतील जून 2025 मध्ये सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून ड्रोन सर्वेक्षणाची ओआरआय ( ऑर्थो रेक्टिफाइड इमेज) प्राप्त झाली आहे. त्यानुसार पंढरपूर , इसबावी, भटुंबरे, शेगांव दुमाला येथील पंढरपूर नगरपरिषद हद्दीतील स्थावर मालमत्तांचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे नगर भूमापनाचे काम करण्यात येणार आहे, अशी माहिती भूमि अभिलेख उप अधीक्षक पूजा आवताडे यांनी दिली आहे.
नागरी स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रातील विस्तारित क्षेत्राचे भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) आधारित सर्वेक्षण व नगर भूमापन करण्याबाबत नक्शा हा कार्यक्रम केंद्र शासनाकडून एक वर्षाच्या प्रायोगिक तत्त्वावर पंढरपूर येथे पथदर्शी स्वरूपात राबविण्यात येत आहे. यामध्ये पंढरपूर नगरपरिषद हद्दीतील नगर भूमापन करण्याबाबत जिल्हाधिकारी सोलापूर यांनी १६ जुलै २०२५ रोजी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदींनुसार अधिसूचना, नोटीस अ मंजूर केली आहे.
यामध्ये उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील कर्मचारी तसेच सायबर स्विफ्ट इन्फोटेक प्रा लि. या एजन्सी प्रतिनिधी प्रत्यक्ष मिळकतींना भेट देऊन ग्राउंड ट्रुथिंग करणार असून त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन श्रीमती आवताडे यांनी केले आहे.
नक्शा प्रकल्पाचा नागरिकांना होणारा लाभ या सर्वेक्षणामुळे धारक अधिकार अभिलेखाचे जीआयएस आधारित नकाशा व मिळकत पत्रिका मिळण्यासह मिळकतींचा नकाशा तयार होऊन त्यांचे क्षेत्र व अक्षांश-रेखांश सहित सीमा निश्चित होणार आहे. त्यामुळे मिळकत धारकांच्या नागरी हक्कांचे संरक्षण होणार आहे. मिळकत पत्रिकेच्या स्वरूपात अधिकार अभिलेख उपलब्ध झाल्यामुळे मिळकतींचे मूल्यांकन वाढून कर्ज घेणे प्रक्रिया सुलभ होईल तसेच मिळकतीबाबतचे न्यायालयीन दावे कमी होण्यास मदत होईल, असे श्रीमती आवताडे यांनी सांगितले.
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…
दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…