Categories: Uncategorized

सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटास धक्का,संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांचा राजीनामा

विश्वासात न घेता पदाधिकाऱ्यांची नियुक्ती,पक्ष श्रेष्ठींचा विश्वास नसल्याचे दिले कारण 

गेल्या अनेक दशकापासून सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचे एक खंबीर आणि आक्रमक नेतृत्व अशी ओळख राहिलेले शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्ष प्रमुख एकनाथ  शिंदे यांच्याकडे पाठवला आहे.शिवाजी सावंत यांनी तीन वेळा माढा विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती.सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असताना शिवाजी सावंत यांनी या जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा हाती घेत राजकीय वाटचालीस सुरुवात केली.हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक अशी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी झाले होते.आणि यातूनच पक्षाने त्यांच्यावर सोलापूर जिल्हा समन्वयक,जिल्हा संपर्क प्रमुख अशा जबाबदाऱ्या टाकल्याचेही दिसून आले होते.पुढे २०२२ मध्ये शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवाजी सावंत यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत राहणे पसंत केले.संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी पक्षाकडून सोपिवण्यात आली होती.मात्र गेल्या दोन वर्षाच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात गटबाजी बोकाळली असल्याचेच चित्र पहावयास मिळत होते.यातूनच जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाच्या शिवसैनिकांमध्ये देखील मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र होते.नुकताच पंढरपुरात शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी मेळावा देखील शिवाजी सावंत यांनी घेतला होता.मात्र या मेळाव्यास अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित नसल्याचे दिसून आले होते.आणि या मेळाव्यात बोलताना अनेक पदाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष वेधत जिल्ह्यात संपर्क प्रमुखाला विचारात न घेता,माहिती न देता परस्पर अनेक पदाधिकारी नियुक्त केले जात असल्या बाबत उघड नाराजीही व्यक्त केली होती.तर मागील दोन महिण्याच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदेग गटात अनेक पक्ष प्रवेश झाले परंतु त्यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख या नात्याने शिवाजी सावंत हे उपस्थित देखील नसल्याचेच पहावयास मिळाले होते.आणि यातूनच शिवाजी सावंत आणि त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली होती.     

तर माढा तालुक्यात देखील शिवसेनेत मोठी गटबाजी दिसून येत असल्याचेच चित्र असून लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले संजय कोकाटे हे पुन्हा शिवसेना शिंदेग गटात परत आले आहेत तर नुकतंच त्यांनी माढा तालुक्यातील शिवसैनिक पदाधिकारी यांची स्वतंत्र बैठकही घेतली होती.त्यामुळे अशा विविध घडामोडी पहाता अखेर शिवाजी सावंत यांनी आपला राजीनामा दिला आहे.  

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटची भरारी; फ्रीस्टीन इन्फोटेकमध्ये चार विद्यार्थ्यांची निवड

संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४ लाखांचे पॅकेज पंढरपूर : प्रतिनिधी अत्याधुनिक शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि…

3 days ago

पंढरपूर सिंहगडच्या प्लेसमेंटचा डंका; सानिकाला ९ लाखांचे पॅकेज

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी…

5 days ago

अजितदादांच्या जयंतीनिमित्त अजितदादा सुकन्या योजना राबविणार

लोकनेता पुरस्कार देवून सन्मान करणार - राष्ट्रवादीचे श्रीकांत शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम लोकनेते तथा महाराष्ट्राचे…

6 days ago

स्थापत्य अभियांत्रिकी विभागात व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम उत्साहात संपन्न

पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामार्फत…

6 days ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूटच्या प्रा. बाबर व प्रा. लंबे यांच्या संशोधनाला भारत सरकारचे पेटंट

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथील प्राध्यापक डॉ. अनिल बाबर आणि…

2 weeks ago

पंढरपूर सिंहगडच्या दोन विदयार्थ्यांची स्टर्लिंग अँड विल्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये निवड वार्षिक ५ लाख पॅकेजची नोकरी

पंढरपूर: प्रतिनिधी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ…

2 weeks ago