ताज्याघडामोडी

पंढरपूर दि: २९ जुलै रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे नागपंचमी हा सण अतिशय उत्साहात साजरा झाला.

कर्मयोगी विद्यानिकेतन ही एक संस्कार आणि परंपरा जपत ज्ञानदान करणारी शाळा म्हणून पंढरपूर पंचक्रोशीमध्ये नावारूपास आली आहे. सण वार, रीती रिवाज, रूढी परंपरा ह्यांची सांगड निसर्गाशी घालत, जपत तंत्रज्ञानाकडे झेपावणाऱ्या ह्या नवीन पिढीला आपल्या संस्कारांची शिदोरी घेऊनच उंच भरारी मारायची आहे, असे कर्मयोगी विद्यानिकेतन च्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई म्हणाल्या. आणि म्हणूनच
श्रावण महिन्यातील पहिला सण असणाऱ्या नागपंचमीला शाळेच्या विद्यार्थ्यांना नागपंचमीच्या सणाचे महत्त्व सांगितले. यावेळी प्रशालेमध्ये सर्प अभ्यासक श्री. बालाजी बडवे आणि इतर सर्पमित्र यांना आमंत्रित करून शिक्षक व विद्यार्थ्यांना नागाविषयी व विविध सापांविषयी असणारे समज व गैर समज आणि अंधश्रद्धा यांवर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले,”हा सण पर्यावरणाचा आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.”

याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये पंचमीची गाणी, झिम्मा, फुगडी, फेर धरले. असे विविध पारंपारिक खेळ खेळून मनसोक्त आनंद घेतला.
नागपंचमीच्या या उत्साही वातावरणात शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये सणाचे महत्त्व आणि निसर्गाबद्दल आदरभाव निर्माण झाला. कार्यक्रमात सर्व शिक्षकही उत्साहाने सहभागी झाले होते.
ह्या वेळी श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूरचे चीफ ट्रस्टी श्री रोहनजी परिचारक आणि संस्थेचे रजिस्ट्रार श्री गणेशजी वाळके, इन्नर व्हील क्लबच्या अध्यक्षा वैशाली काशिद आणि सचिव माधुरी जोशीही उपस्थित होत्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

36 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago