ताज्याघडामोडी

पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना इंटक च्या वतीने मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या समवेत झालेल्या कामगार संघटनेच्या बैठकीमध्ये सर्व मागण्या मान्य

पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना इंटक च्या वतीने नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्याबाबत
पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे साहेब ,उपमुख्याधिकारी रवींद्र सूर्यवंशी यांच्या समवेत बैठक आयोजित केली होती या वेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे, कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, जनरल सेक्रेटरी अँड.सुनील वाळूजकर, उपाध्यक्ष संतोष सर्वगोड, धनजी वाघमारे, दिनेश साठे, जयंत पवार सतीश सोलंकी व इतर पदाधिकारी समवेत झालेल्या बैठकीमध्ये खालील मागण्या मान्य करण्यात आल्या
यामध्ये प्रामुख्याने पंढरपूर नगर परिषदे कडील सन २०२३ पासून ५६ सफाई कर्मचारी व लिपिक शिपाई कर्मचारी सेवानिवृत्त झाले होते या कर्मचाऱ्यांना उपदानाची रक्कम रुपये २ कोटी ४२ लाख व रजा वेतनाची रक्कम रुपये १ कोटी ७० लाख देण्यात आलेले नव्हते अनेक कर्मचारी सेवानिवृत्त होऊन सुद्धा पैसे मिळालेली नसल्याने अतिशय आर्थिक अडचणीत सापडले होते ही बाब मुख्याधिकारी साहेब यांच्या निदर्शनास आणल्या नंतर मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सकारात्मक भूमिका घेत उपदानाची रक्कम रुपये २ कोटी ४२ लाख येत्या दोन ते तीन दिवसात देण्याचे मान्य केले आहे व उर्वरित रजा वेतनाची रक्कम लवकरच देण्यात येईल असे आश्वासन दिले तसेच जे सफाई कर्मचारी शिपाई कर्मचारी सॅनिटरी इन्स्पेक्टर इंजिनियर ग्रॅज्युएट उच्च शिक्षण घेतला आहे. अशा कर्मचाऱ्यांना नगरपालिकेमध्ये त्यांच्या शिक्षणाानुसार लिपिक अतिक्रमण विभाग बाग बांधकाम कर विभाग या ठिकाणी कामे देण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला तसेच ज्या कर्मचाऱ्यांना असे काम करायचे त्यांनी आपले अर्ज मुख्याधिकारी व पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटना अध्यक्ष व जनरल सेक्रेटरी यांच्याकडे द्यावेत त्यांची शैक्षणिक अहर्ता व काम करण्याची कुवत पाहून निश्चितपणाने त्यांना काम दिले जाईल असे आश्वासनही यावेळी मुख्याधिकारी यांनी दिली तसेच गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर नगरपरिषद कर्मचारी पतसंस्था नंबर १ याची सुमारे ६० ते ७० लाख रुपये नगरपरिषदेने दिलेले नव्हते त्यामुळे कर्मचारी पतसंस्था अतिशय आर्थिक अडचणीत आली होती तसेच नगरपरिषदेकडून रक्कम न मिळाल्याने सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक व ज्या कर्मचाऱ्यांच्या ठेवी आहेत त्यांनाही रकमा परत देण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या याबाबत चर्चा होऊन लवकरच जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत अशा पतसंस्थेकडून कर्ज घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या देय रकमा देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. महेबूब शेख हे सन २०१७ मध्ये मयत झाले होते या मयत कर्मचाऱ्यांला अद्याप पर्यंत कोणतीही रक्कम मिळालेली नाही त्यावरही चर्चाहून सदरची रक्कम देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.सफाई कर्मचारी शिपाई लिपिक यांना शासन निर्णयानुसार १२ व २४ वर्षाची तसेच १०/२०/३० ची आश्वासित प्रगती योजना लागू होण्याच्या दृष्टीने लवकरच कारवाई केली जाईल अशी आश्वासन यावेळी दिले. तसेच वरिष्ठ लिपिकाची रिक्त पदे भरून त्यांना पदोन्नती देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येईल. सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी वर्षातून दोनदा आरोग्य शिबिरही घेण्यात येणार आहेत तसेच यापूर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेब यांच्याशी कामगार संघटनेची चर्चा झाली होती यामध्ये ज्या कामगार वस्ती आहेत त्या ठिकाणी लायब्ररी व ओपन जिम ही करण्याचा प्रस्ताव मान्य करण्यात आला होता त्याचीही कारवाई लवकर करण्यात येईल अशी आश्वासन यावेळी देण्यात आले तसेच कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा पॉलिसी काढण्यात येणार असून यातील ५०% होणारी रक्कम नगरपरिषद व ५० % रक्कम कर्मचाऱ्यांकडून घेण्यात येणार आहे जेणेकरून किमान पाच लाखापर्यंत कोणताही आजार झाला तर त्याचा खर्च संबंधित विमा कंपनी उचलेल त्या दृष्टीने कर्मचाऱ्यांचा विमा उतरण्यात येणार आहे तसेच मलेरिया विभागाकडील रिक्त पदावर गेले अनेक वर्षांपासून कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करीत आहेत तरी या कर्मचाऱ्यांना या रिक्त पदावर सामावून घेण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून सदरची पदांची भरती करावी अशी मागणी करण्यात आली व इतरही मागण्यावर चर्चा होऊन वेळोवेळी कामगार संघटनेची बैठक घेऊन सर्व मागण्या मार्गी लावण्याचा आश्वासन यावेळी मुख्याधिकारी महेश रोकडे साहेब यांनी दिले यावेळी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी अँड सुनिल वाळूजकर यांनी मुख्याधिकारी साहेब यांनी आषाढी यात्रा कालावधीमध्ये अतिशय उत्कृष्ट काम केल्याबद्दल व कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सकारात्मक भूमिका घेत कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची हमी दिल्याने कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व आभार व्यक्त करण्यात आले यावेळी कामगार संघटनेचे अध्यक्ष महादेव आदापुरे , जनरल सेक्रेटरी.अँड. सुनिल वाळूजकर कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे सहकार्याध्यक्ष शरद वाघमारे नागनाथ तोडकर, उपाध्यक्ष जयंत पवार, धनजी वाघमारे, संतोष सर्वगोड, सतीश सोलंकी ,दत्तात्रय चंदनशिवे. चेतन चव्हाण अनिल अभंगराव.संजय वायदंडे महावीर भाऊ कांबळे, दिनेश साठे, प्रीतम येळे, मोहन अधटराव संजय मारुती माने, पराग डोंगरे, संदेश कांबळे, संभाजी देवकर, दर्शन वेळापुरे, संजय रामचंद्र माने, राणी गायकवाड,सचिन इंगळे, वैभव दंदाडे, शिरीष माने, सुरेश पवार, लक्ष्मी हुंडेकरी हे उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

स्वेरीमध्ये ‘नॅशनल एज्युकेशन डे’ उत्साहात साजरा

पंढरपूर - गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये यंदाचा ‘राष्ट्रीय शिक्षण…

3 days ago

पंढरपुरात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रोबोटिक,लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.शैलेश पुणतांबेकर यांची सेवा उपलब्ध

लाईफलाईन हॉस्पिटल येथे कॅन्सरसह विविध गंभीर आजारावर शस्त्रक्रियांची सोय डॉ. शैलेश पुणतांबेकर हे पुण्यातील एक…

7 days ago

स्वेरीमध्ये अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरसाठी नीति आयोगाबरोबर सामंजस्य करार

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कॅम्पसमध्ये ‘अटल कम्युनिटी इनोव्हेशन…

1 week ago

येत्या शनिवारी स्वेरीत माजी विद्यार्थी मेळावा आणि पदवीप्रदान समारंभ

पंढरपूर- ‘गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा 'माजी विद्यार्थी मेळावा' आणि ‘पदवीप्रदान समारंभ’ स्वेरी कॉलेज कॅम्पस मध्ये येत्या…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे कृत्रिम बुद्धिमत्ता व व्हिजन तंत्रज्ञानावर चर्चा

पंढरपूर सिंहगडमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन: पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

1 week ago