ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिटयूटच्या वीस विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड .

“कर्मयोगी प्लेसमेंट २०२५”

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागातील आठ तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील बारा अश्या एकूण वीस विद्यार्थ्याची कॅम्पस मुलाखती मधून कंपनी मध्ये निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.
पुणे येथील शाफ्लर इंडिया प्रा. लि. या नामांकित कंपनीने घेतलेल्या मुलाखातीमधून मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागातील प्रथमेश बिनवडे, आकाश खंदारे , गौरव लांडगे, प्रतीक क्षीरसागर, ओम मुंडे, निलेश केसकर, संतोष माने, शिवलिंग सूर्यवंशी यांची तर एपिटॉम कोम्पोनंट्स प्रा. लि या कंपनीने इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील काशीनाथ आंदेवाडी, प्रदीप पाटील, प्रज्ञा पाटील, आकांक्षा गायकवाड, प्राची भाग्यवंत, प्रतीक्षा पवार, आकांक्षा पाटील, स्वामींनी चव्हाण, वैभव गायकवाड, आविष्कार चव्हाण, सूरज डोके, अनिकेत सातपुते या विद्यार्थ्यांची निवड केली आहे. दर वर्षी प्रमाणेच शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ही कर्मयोगीने प्लेसमेंट क्षेत्रामद्धे आपले प्रभुत्व कायम ठेवले आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होण्याआधीच च विद्यार्थ्यांची नामांकित कंपनी मध्ये निवड होताना दिसून येत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आणि महाविद्यालयाच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत दिले जाणारे प्रशिक्षण हे कार्पोरेट क्षेत्रात नोकरी लागण्यासाठी अतिशय पूरक व उपयोगी होत आहे असे निवड झालेल्या विद्यार्थी आवर्जून सांगतात.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री. रोहन परिचारक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. राहुल पांचाळ, विभागप्रमुख डॉ. एस एम लंबे , डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, प्रा. अभिनंदन देशमाने, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट समन्वयक, विद्यासागर जगताप, प्रा. सुशील कुलकर्णी, प्रा.दत्तात्रय चौगुले, प्रा. योगेश माने व इतर सर्व प्राध्यापक यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एसक्यूएल प्रशिक्षण; ७५ हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

प्लेसमेंटच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यविकासासाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेलचा पुढाकार सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर…

4 days ago

साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!

शैक्षणिक संस्थांचा पाठिंबा; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला सातारा : पुणे विभाग…

1 week ago

शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांचा निर्धार; प्राध्यापकांचे रोजगारहित आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्राधान्य

NEP २०२०च्या नावाखाली प्राध्यापकांची पदे कमी होऊ देणार नाही; आश्रमशाळांच्या सुधारणांसाठी कटिबद्ध! पुणे : राष्ट्रीय…

1 week ago

विजयादशमीच्या मुहूर्तावर साताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात!

गृहभेटी, दूरध्वनी संपर्क आणि वैयक्तिक संवादातून शिक्षक मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर   सातारा : पुणे विभाग…

1 week ago

सांगोला तालुक्यात डॉ.बी.पी. रोंगे सरांचा दबदबा

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर विजयी होणार सांगोला– राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर…

2 weeks ago

सांगली जिल्ह्यात ज्ञानयात्री डॉ.बी.पी. रोंगे सरांना उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञानयात्री डॉ. रोंगे सर १०० टक्के विजयी होणार मिरज – राज्यातील शिक्षक मतदार संघाची निवडणूक…

2 weeks ago