पंढरपूर/प्रतिनिधी

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या प्रमुख उपस्थित रविवारी मंगळवेढा येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे पार पडली.
यावेळी मंगळवेढा तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मोठ्या ताकतीने राज साहेब ठाकरे यांचा नेतृत्वाखाली सामोरे जाणार असून गाव तिथे शाखा घर तिथे कार्यकर्ता हे अभियान राबवण्यात येत आहे. विविध पक्षातील लोक मनसेमध्ये प्रवेश करत आहेत.कायम मनसेचे कार्यालय विविध प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांनी भरलेले असते नागरिकांचा विश्वास कायम मनसेच्या सोबत असल्यामुळे येणार काळात या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसेला यश मिळेल असा विश्वास व्यक्त करत निवडणुकीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पूर्ण ताकतीनिशी कामाला लागावे. पक्ष कायम पाठीशी राहिल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी त्यांनी मनसेमध्ये अनेक पक्षाचे नेतेमंडळी पक्ष प्रवेश करत असल्याने आगामी काळात निष्ठावंत महाराष्ट्र सैनिक आणि नवीन लोकांचा मेळ घालून काम करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी व्यासपीठावर मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, समन्वयक नारायण गोवे, उपजिल्हाध्यक्ष चंद्रकांत पवार, पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, नूतन मंगळवेढा तालुका अध्यक्ष धनाजी गडदे,सांगोला तालुकाध्यक्ष अनिल केदार, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, शहराध्यक्ष संतोष कवडे, संघटक गणेश पिंपळनेरकर, विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष अवधूत गडकरी व उप शहराध्यक्ष प्रदीप परचंडे,उप तालुकाअध्यक्ष कृष्णा ताड इत्यादी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

26 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago