पंढरपूर तालुका पोलिसांची कामगिरी,एकूण 11 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त
पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे गुरसाळे या गावी दिनांक 30/6/2025 रोजी रुपेश अजितराव देवकाते वय 27राहणार घोसाळे यांच्या मालकीच्या शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या दोन पाण्याच्या मोटरी चोरीस गेल्या बाबत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता.पंढरपूर तालुका पोलिसांनी एकूण चार आरोपींची नावे निष्पन्न करून त्यापैकी दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल तपास करून एकूण पाच शेती पंपाच्या पाण्याच्या मोटरी किंमत रुपये दोन लाख पंधरा हजार व एक मोटरसायकल असा एकूण दोन लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केलेला असून आणखीन सदर मोठा चोरीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.आणखीन सदर मोठा चोरीच्या गुन्ह्यामध्ये आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने पंढरपूर तालुका पोलीस तपास करत आहेत.तसेच वेळापूर येथील आषाढी वारीच्या वेळेस दोन जुलै 2025 रोजी महिंद्रा कंपनीचा स्वामी दत्तकृपा दिंडीतील वारकरी दिंडी पालखी मधील ट्रॅक्टर चोरीला गेलेला होता त्याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांनी तपास करून चोरीस गेलेला ट्रॅक्टर चळे या गावातून जप्त केलेला आहे.
याबाबत वेळापूर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 251/ 25 बी एम एस कलम 303 2 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.जप्त करण्यात आलेल्या ट्रॅक्टर बाबत वेळापूर पोलीस स्टेशन येथे पुन्हा दाखल आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर,पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले,पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाढणे,सहाय्यक फौजदार शेंडगे,पोलीस हवालदार घंटे, पोलीस हवालदार सय्यद,बालाजी कदम,सुधीर शिंदे,दीपक भोसले,सुहास देशमुख,गजानन माळी,सागर गवळी,चालक पोलीस कॉन्स्टेबल नदाफ गोडसे यांच्या पथकाने कामगिरी केली आहे
स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…
पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…
पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…
कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…
माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…