ताज्याघडामोडी

भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्यपदी लक्ष्मण तात्या धनवडे यांची निवड

मा.आ.प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदशनाखाली आता पक्षाची मोठी जबाबदारी पार पाडण्याची संधी

पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली, भैरवनाथ वाडी, ईश्वर वठार या परिसरातील माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे खांदे समर्थक म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मण तात्या धनवडे यांची भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य पदी निवड करण्यात आली‌.
सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विविध पदावर लोक कल्याणाची कामे करणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मण तात्या धनवडे यांनी यापूर्वी देखील विविध राजकीय पदे भूषवलेले आहेत .शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न करणारे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या न्याय हक्क मागणीसाठी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असलेले लक्ष्मण तात्या धनवडे यांनी यापूर्वी पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सभापती म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे.
लक्ष्मण तात्या धनवडे यांनी भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या जिल्हा अध्यक्ष पदावर असताना मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बांधणी व धोरण अवलंबलेले होते त्यांनी पंढरपूर तालुक्यांमध्ये भारतीय जनता पक्ष वाढीसाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठे काम केले आहे. या त्यांच्या कामाची दखल महाराष्ट्र राज्य भारतीय भाजपा पार्टीच्या वतीने घेऊन त्यांची भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य पदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे.
लक्ष्मण तात्या धनवडे यांची राज्य परिषद सदस्य पदी निवड झाल्यानंतर संपूर्ण पंढरपूर तालुका व सोलापूर जिल्ह्यामधून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या निवडीनंतर त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये आपले मनोगत व्यक्त करीत असताना ते म्हणाले जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पक्ष सोलापूर जिल्ह्यामध्ये कसा वाढीस लागेल याकडे लक्ष देऊन आम्ही सतत प्रयत्नशील राहून भाजपा पक्षाला बळकटी देण्याचे काम आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली केले व करीत राहणार आहोत.सर्वसामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी यांना शासनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत, आणि यापुढे देखील आम्ही शेतकरी बंधू भगिनींच्या कल्याणासाठी कार्य करणार आहोत. या निवडीमुळे मला सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी यांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. या निवडीबद्दल धनवडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, सोलापूर जिल्ह्याचे विधान परिषदेचे माजी आमदार व आमचे नेते प्रशांतराव परिचारक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या संधीचे सोने केल्याशिवाय मी राहणार नाही. त्यासाठी सर्वसामान्य जनतेचे कामे मार्गी लावणार आहोत. असे लक्ष्मण तात्या धनवडे यांनी आपली भारतीय जनता पार्टी राज्य परिषद सदस्य पदी निवड झाल्यानंतर आपले मनोगत व्यक्त केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago