ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन मध्ये आषाढी वारी निमित्त भव्यदिंडी सोहळा संपन्न

पंढरपूर दिनांक :2 जुलै रोजी श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन येथे सालाबादप्रमाणे लहानग्यांच्या प्रचंड उत्साहात दिंडी सोहळा संपन्न झाला.

कर्मयोगी विद्यानिकेतन म्हणजे अभ्यासासह संस्कार आणि परंपरा जपत ज्ञानदान करणारी शाळा असे पंढरपूर पंचक्रोशी मध्ये नावारूपास आली आहे.आषाढी वारीच्या औचित्याने आज दिनांक 2 जुलै रोजी अशाच शिस्तबद्ध आणि देखण्या नियोजनाने, सुंदर अशा वेशभूषा करून लहानगे नटून थटून अगदी प्रसन्न मुद्रेने या सोहळ्यात सहभागी झाले होते.मुली विविध पारंपरिक पेहेराव करून दिंडीत सहभागी झाल्या होत्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून  श्री व सौ. सोमनाथ काळे, श्री व सौ ऋषिकेश कुलकर्णी, श्री व सौ अटकळे  आणि सौ लिंगायत हजर होते,या पालकांच्या हस्ते या दिंडी सोहळ्याचे उद्घाटन झाले.प्राचार्य मॅडम सौ प्रियदर्शिनी सरदेसाई यांचे हस्ते पालखी पूजन व श्री. व सौ. सोमनाथ काळे आणि श्री. व सौ. ऋषिकेश कुलकर्णी आणि सौ लिंगायत यांचे हस्ते आरती करून पांडुरंगाला वंदन केले. 

दिंडी सोहळ्याची वाट पाहत उभे असलेल्या महिला पालकांनी पालखी आणि घोड्याचे पूजन केले हे सर्व पाहून विद्यार्थी आणि पालक अगदीच भावुक झाले. 

या सोहळ्याच्या कार्यक्रमाला संस्थेचे चीफ ट्रस्टी श्री. रोहन परिचारक यांनी विद्यार्थ्यांना वारीनिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे रजिस्ट्रार श्री. गणेश वाळके यांनी लहानग्यांचे सजलेले चेहरे आणि त्यांचे नटखट खेळ पाहून आनंद व्यक्त केला.

दिंडी सोहळ्यासाठी आदल्या दिवशी पासून सर्व शिक्षकांनी तयारी केली होती. यासाठी सर्वच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि हातभार लाभले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

58 minutes ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago