ताज्याघडामोडी

सोलापूर जिल्ह्यातील रक्त टंचाई ला कर्मयोगी कडून साद रोहन परिचारक यांचा वाढदिवस स्तुत्य उपक्रमांनी साजरा, २३८ जणांचे रक्तदान.

सोलापूर जिल्ह्यामध्ये रक्ताची टंचाई निर्माण झाली असून संपूर्ण जिल्ह्यात केवळ दहा दिवस पुरेल इतकाच रक्त साठा उपलब्ध आहे या जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन रोहन परिचारक यांच्या वाढदिवसानिम्मीत्त साद देण्यात आली.
समाजाप्रती नेहमीच दायीत्व दाखविणार्‍या रोहन परिचारक यांचा वाढदिवस कर्मयोगी इन्स्टिटयूट मद्धे रक्तदाना चा संकल्प करून साजरा करण्यात आला. यामध्ये कर्मयोगी अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक, फार्मसी, नर्सिंग, ज्युनियर कॉलेज इ. संस्थांच्या सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यानी रक्तदान केले. यामधे सुमारे २३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, सिव्हिल व मेकॅनिकल विभागाच्या विद्यार्थी संघटनेतर्फे या रक्तदानाचे आयोजन करण्यात आले.
सदरच्या सर्व कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग चे प्रा. गुरुराज कुलकर्णी,कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ फार्मसी चे डॉ. सचिन जाधव तसेच कर्मयोगी शैक्षणिक समूहातील डिग्री इंजिनियरिंग, पॉलिटेक्निक, नर्सिंग, फार्मसी, ज्युनिअर कॉलेज या सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर उपक्रमासाठी पंढरपूर ब्लड बँक व अक्षय ब्लड बँक सोलापूर यांचे विशेष सहकार्य लाभले. रक्तदान केल्यानंतर रक्तदात्यांसाठी रामभाऊ लोकरे यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. गणेश बागल यांनी विशेष परिश्रम घेतले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago