ताज्याघडामोडी

कर्मयोगी च्या निसर्गरम्य प्रांगणात राज्यस्तरीय तंत्र परिषदेचे आयोजन. कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये २६ एप्रिल रोजी संपन्न होणार “कर्माटेक २०२५”

विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकीमधील ज्ञान वृधिंगत होऊन त्याला चालना व प्रोत्साहान देण्यासाठी कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (अभियांत्रिकी) महाविद्यालय शेळवे पंढरपूर येथे शनिवार दि. २६ एप्रिल २०२५ रोजी “कर्माटेक २०२५” या राज्यस्तरीय तंत्र परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे चेअरमन रोहन परिचारक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली.
याबाबत ची अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील म्हणाले की “कर्माटेक २०२५” मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलि कम्युनिकेशन, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग, सिव्हिल व मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागातील विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकीच्या ज्ञानावर आधारित विविध स्पर्धेचे आयोजन केले आहे. यामध्ये आयडिया प्रेझेंटेशन, सी हंट, पोस्टर प्रेझेंटेशन, प्रोजेक्ट एक्सिबीशन, ब्रिज मॉडेल मेकिंग, इलेक्ट्रॉनिक्स क्वीज, सर्किट सुडोकू, ग्रीन बिल्डिंग, इलेक्ट्रॉनिक्स क्विज अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांसाठी पन्नास हजार रुपायंहून अधिक ची बक्षिसे दिली जाणार आहेत. या सर्व स्पर्धा राज्यस्तरीय स्तरावर होतील. तसेच सदरच्या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून जवळपास पाचशेहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार असून अभियांत्रिकीच्या सर्व शाखेतील विद्यार्थ्यानी आपला सहभाग नोंदवावा तसेच ऐनवेळी येणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध केली आहे याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन “कर्माटेक २०२५” चे संयोजक डॉ. अभय उत्पात व सहसंयोजक प्रा. दीपक भोसले यांनी केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर मध्ये अभियंता दिन उत्साहात

इ अँड टी सी (E&TC) विभागाला बेस्ट डिपार्टमेंट अवॉर्ड , अभियंता म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर— इआर.…

4 days ago

रविवारी कुर्डुवाडीत ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन

स्वेरी व एस.व्ही.आय.टी. चा संयुक्त उपक्रम कुर्डुवाडी- शिक्षणातील नवनवीन उपक्रमासाठी राज्यात प्रसिद्ध असलेल्या गोपाळपूर येथील…

1 week ago

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

1 week ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

2 weeks ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

3 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

3 weeks ago