ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिट्यूट चे प्राध्यापक एस एम लंबे यांना पीएचडी प्रदान.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमुनिकेशन विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक सोमनाथ मुरलीधर लंबे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्यातर्फे पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
‘प्रोटेक्टींग पॉवर फॅक्टर करेक्शन कॅपॅसीटर्स फ्रॉम ओव्हर होल्टेज कॉजड बाय हार्मोनिक्स युजिंग ऑटो ऍडजेस्टेबल हाय क्यू फिल्टर’ या विषयांमध्ये त्यांनी संशोधन पूर्ण केले.
विशेष महत्त्वाची बाब म्हणजे केवळ तीन वर्षांमध्ये त्यांनी संशोधन पूर्ण केले याबद्दल त्यांचे शैक्षणिक क्षेत्रामध्ये विशेष कौतुक होत आहे.
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक, ‘ऋतुरंग २०२५’ या कार्यक्रमाचे चे प्रमुख अतिथी डॉ. मिलिंद परिचारक यांच्या हस्ते प्राध्यापक सोमनाथ लंबे यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे, रजिस्ट्रार जी डी वाळके, कर्मयोगी समूह अंतर्गत असणाऱ्या नर्सिंग, फार्मसी, जुनियर कॉलेज चे प्राचार्य, अधिष्ठाता, विभाग प्रमुख, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त

पंढरपूर: येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेच्या प्राचार्या प्रियदर्शिनी सरदेसाई यांना इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड यांच्या मार्फत…

3 days ago

प्रा. मोहसीन शेख यांना इनोव्हेटिव टीपीओ पुरस्कार

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजिचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मोहसीन शेख…

2 weeks ago

मैफिल सप्तसुरांची” कार्यक्रमाने जिंकली रसिकांची मने

गुढीपाडवा व नववर्षानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने आयोजित केलेल्या सुशील कुलकर्णी व सहकारी प्रस्तुत…

2 weeks ago

राष्ट्रीय स्तरीय अबॅकस कॉम्पिटिशन स्पर्धा परीक्षेत “स्वराज खंडागळे, भारतात पहिला

प्रथम क्रमांकाने भारतात उत्तीर्ण झाल्याबद्दल पंढरपूर सह जिल्ह्यातून शुभेच्छाचा वर्षाव पंढरपूर (प्रतिनिधी ) पंढरपूर येथील…

2 weeks ago

कर्मयोगी इन्स्टिट्यूट च्या ‘ऋतुरंग २०२५’ मध्ये तरुणाईच्या जल्लोषाला उधाण

डॉ. मिलिंद परिचारक यांची प्रमुख उपस्थिती श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, शेळवे…

3 weeks ago

पंढरपूर येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे व्याख्यानमाला संपन्न तीन दिवशीय व्याख्यानमालेने श्रोते मंत्रमुग्ध.

पंढरपूर (प्रतिनिधी)समाज माध्यमांचे जसे फायदे आहेत तसेच माध्यमांमुळे चुकीची माहिती पसरवण्याची शक्यता जास्त असून अनेकदा…

1 month ago