ताज्याघडामोडी

पंढरपूर येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे व्याख्यानमाला संपन्न तीन दिवशीय व्याख्यानमालेने श्रोते मंत्रमुग्ध.

पंढरपूर (प्रतिनिधी)समाज माध्यमांचे जसे फायदे आहेत तसेच माध्यमांमुळे चुकीची माहिती पसरवण्याची शक्यता जास्त असून अनेकदा समज माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती पसरविली जाते .सोशल मीडियाची ताकद इतकी आहे की जगातील अनेक देशात या सोशल मीडियातील प्रचारामुळे सरकार बदलली गेली आहे अशी माहिती आपल्या व्याख्यानातून डॉ.आशुतोष जावडेकर यांनी दिली. महाराष्ट्र साहित्य परिषद पंढरपूर शाखेच्या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प आशुतोष जावडेकर यांच्या व्याख्यानाने संपन्न झाले पुढे बोलताना जावडेकर म्हणाले की, भविष्यात इमोजी हे एक भाषाशास्त्रच होईल.जगात अनेक भाषा बोलल्या जातात परंतु इमोजी मुळे जगाची भाषा एक होऊ शकते .अनेक लहान मुले इमोजी वापरून आपल्या भावना व्यक्त करतात व्याकरण,व्यंजन, लिपी या दुय्यम गोष्टी असून इमोजीच्या माध्यमातून भावना आणि अर्थ एकमेकांना पोहोचण्याचे काम समाज माध्यमातून या इमोजीद्वारे होत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. त्याला जोडूनच के बी.पी. कॉलेजचे मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ. रमेश शिंदे कार्यवाह कल्याणराव शिंदे यांनी प्रकट मुलाखतीतून त्याच्यातील विविध प्रकारच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला.पाहुण्यांचा परिचय मंदार केसकर यांनी करून दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वेरी कॉलेजचे प्राचार्य बी.पी.रोंगे सर हे होते. याच व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प हे कवींच्या कविता संमेलनाने संपन्न झाले. यामध्ये सांगली येथील सुप्रसिद्ध कवी रमजान मुल्ला, सुनील जवंजाळ(चोपडी)
शिवाजी बंडगर(सांगोला) सूर्याचीभोसले(पुळुज )प्रेमकुमार वाघमारे(सांगोला) या कवींच्या कविताने वातावरण फुलून गेले. कवी रमजान मुल्ला यांच्या

अंतरातल्या किंकाळीने बधीर झालो आहे, मला वाटते मी चोखोबा कबीर झालो आहे.
या कवितेने रसिकांची मनी जिंकली.त्याचबरोबर नाझरे येथील सुनील जवंजाळ यांनी . *कुठला चंद्र आणि कुठल्या
चांदण्या रोज मोजाव्या लागतात कूकरच्या शिट्या ही कविता सादर करून रसिकांना हसवत गंभीर केले. तसेच कवी संमेलनाचे अतिशय उत्तम सूत्रसंचालन केले.सूर्याजी भोसले यांनी ओढणी व *पुस्तक या कवितामधुर आवाजात सादर केल्या. सांगोल्याचे शिवाजी बंडगर यांनी सांगा मी नंदायाचकी नाय ही कविता सासूची कविता सादर करून खळखळून हसवले. प्रेमकुमार वाघमारे यांनी नेटक्या आवाजात लेक ही कविता सादर केली. इतरही कविता सादर करण्यात आल्या. या कवी संमेलनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उमा कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. मिलिंद परिचारक यांनी भूषविले.त्यांनी आपल्या विडंबन काव्याने रसिकांना खळखळून हसवले
या व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प कथाकथनकार जयवंत आवटे सांगली यांचे होते त्यांनी आपल्या कथाकथनातून प्रेक्षकांमध्ये जसा हशा पिकवला तसेच कथाकथनाचा शेवट करताना श्रोत्यांना गंभीर केले अशी काळजाला हात घालणारी त्यांची ‘जाणती ही कथा प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेऊन गेली. कथाकथनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.कैलास करांडे सर हे होते.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा पंढरपूरयांनीपंढरपूरवासियांसाठी तीन दिवशी व्याख्यानमालेतून साहित्यिक मेजवानी दिली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी/कार्यवाह कल्याणराव शिंदे,पंढरपूर शाखेचे अध्यक्ष सिद्धार्थ ढवळे सर, कार्याध्यक्ष माळी सर , कोषाध्यक्ष मंदार केसकर, प्रा. धनाजी चव्हाण प्रा.डॉ.रमेश शिंदे सर यांनी परिश्रम केले तिन्ही दिवसाच्या कार्यक्रमाची सूत्रसंचालन लेखक, कवी अंकुश गाजरे सर यांनी केले. आभार दत्तात्रय तरळगट्टी सर, भास्कर बंगाळे, शिवाजीराव बागल यांनी मानले. कार्यक्रमासाठी डॉ.मारुती टकले, डॉ.राजेंद्र जाधव पंढरपुरातील साहित्यिक, कवी, लेखक, प्राध्यापक, शिक्षक, महिला,मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते यावेळी नूतन कार्यकारिणी व पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट मध्ये जागतिक महिला दिन विशेष उत्साहात संपन्न. मोफत रक्त तपासणी शिबीराचे आयोजन.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये दिनांक 8 मार्च 2025 रोजी जागतिक…

2 days ago

लोखंडी पहारीने जखमी करून सोन्याची चेन व रोख रक्कम हिसकावून घेतल्या प्रकरणी तीन जणांना अटकपूर्व जामीन मंजूर

अॅड. संदिप कागदे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून अटकपूर्व जमीन मंजूर लोखंडी पहारीने जखमी करून…

4 days ago

सावित्रीच्या लेकींची महिला दिना निमित्त भव्य बाईक रॅली!

दुर्गा महा रॅलीने कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेचा महिला दिन साजरा! कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेमध्ये प्रत्येक उपक्रम…

5 days ago

दहावीची परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडावी प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्या सूचना

   पंढरपूर (दि.04) :- इयत्ता दहावीच्या उर्वरित पेपर साठीची परिक्षा अत्यंक कडक आणि शिस्तबध्द घेण्यात याव्यात. तालुक्यात बोर्डाच्या…

2 weeks ago

वैज्ञानिक बुद्धिमत्तेच्या सहायाने कर्मयोगी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी भरवले भव्य विज्ञान प्रदर्शन!!!!

येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेमध्ये विज्ञानदिनानिमित्त प्रशालेच्या नर्सरी ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन…

2 weeks ago

कालवा सल्लागार समितीचे बैठकीत आ.समाधान आवताडे शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी आक्रमक आ.आवताडे यांच्या मागणीची तत्काळ दखल

पंढरपूर/प्रतिनीधी पुणे येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार समाधान…

2 weeks ago