श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये दिनांक 8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिन विशेष उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाच्या वुमन एम्पोरमेंट क्लब,कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग विभागाच्या परम एक्सेस तसेच इंटरनल क्वालिटी अश्यूरंस सेल व एनएसएस विभागाच्या वतीने महाविद्यालयातील सर्वांसाठी मोफत रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सर्व विद्यार्थिनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे लिपिड प्रोफाइल HbA1c, LFT, KFT, हिमोग्लोबिन अश्या अनेक तपासण्या मोफत करण्यात आल्या. यावेळी हिंद महालॅब यांचे विशेष सहकार्य लाभले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठानचे विश्वस्त रोहन परिचारक यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी कणसे उप प्राचार्य प्रा. जे ल मुढेगावकर, रजिस्ट्रार जी डी वाळके, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. राहुल पांचाळ, विभाग प्रमुख डॉ. एस व्ही एकलारकर, डॉ. एस एम लंबे, प्रा. दीपक भोसले, प्रा. ए टी बाबर, प्रा.अभिनंदन देशमाने उपस्थित होते. सदर शिबिराचे समन्वयक म्हणून प्रा. प्रियांका भादुले यांनी काम पहिले.
पंढरपूर (प्रतिनिधी)समाज माध्यमांचे जसे फायदे आहेत तसेच माध्यमांमुळे चुकीची माहिती पसरवण्याची शक्यता जास्त असून अनेकदा…
अॅड. संदिप कागदे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून अटकपूर्व जमीन मंजूर लोखंडी पहारीने जखमी करून…
दुर्गा महा रॅलीने कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेचा महिला दिन साजरा! कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेमध्ये प्रत्येक उपक्रम…
पंढरपूर (दि.04) :- इयत्ता दहावीच्या उर्वरित पेपर साठीची परिक्षा अत्यंक कडक आणि शिस्तबध्द घेण्यात याव्यात. तालुक्यात बोर्डाच्या…
येथील कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेमध्ये विज्ञानदिनानिमित्त प्रशालेच्या नर्सरी ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन…
पंढरपूर/प्रतिनीधी पुणे येथे झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार समाधान…