ताज्याघडामोडी

लोखंडी पहारीने जखमी करून सोन्याची चेन व रोख रक्कम हिसकावून घेतल्या प्रकरणी तीन जणांना अटकपूर्व जामीन मंजूर

अॅड. संदिप कागदे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून अटकपूर्व जमीन मंजूर

लोखंडी पहारीने जखमी करून सोन्याची चेन व रोख रक्कम हिसकावून घेतल्या प्रकरणी तीन जणांना अटकपूर्व जामीन मंजूर केलेला आहे. लोखंडी पहारीने जखमी करून सोन्याची चेन व रोख रक्कम हिसकावून घेतल्या प्रकरणी १. नामदेव बजरंग रुपनर, २. राहूल नामदेव रूपनर, ३. गिरीधर तानाजी मस्के उर्फ बबलु मस्के सर्व रा. तिसंगी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. सुरवसे साहेब यांनी अटकपूर्व जमीन मंजूर केलेला आहे.

सदरील घटनेची हकीकत अशी की, सदर घटनेतील फिर्यादी हा आप्पासो दादा येळे हा आहे. यातील फिर्यादी हा वरील ठिकाणी आई मैनाबाई वडिल दादा, पत्नी दिपाली, तीन मुले रिया, श्रेया व प्रणय असे एकत्रात राहणेस असून फिर्यादी हा शेती करून कुटूंबाची उपजिवीका भागवतो. फिर्यादी याचे सन २०१८ साली मौजे तिसंगी येथील नामदेव रूपनर यांची मुलगी दिपाली हिचेबरोबर लग्न झालेले होते. मागील तीन वर्षापासून आमचेत व सासरे यांचे किरकोळ कारणावरून वादावादी झाली होती. तेव्हापासून आमचे एकमेकांकडे येणेजाणे नाही. दिनांक २४/१/२०२५ रोजी सकाळी १०.०० वा चे सुमारास फिर्यादीची सासू बायडाबाई ही आमचे घरी आली होती. त्यावेळी सासू बायडाबाई हिने पत्नी दिपाली हिस “नाराज आहेस, काय झाले आहे” असे विचारले असता पत्नी दिपाली हिने “माझेत व पती आप्पा यांचेत किरकोळ वाद झाला आहे असे सांगितले” त्यावेळी सासू बायडाबाई हिने “पत्नी दिपाली हिला माझे सोबत पाठवा.” असे म्हणालेनंतर मी त्यांना, “तुमची मुलगी घेवून जावा व माझे मुलांना इथेच राहू दया.” असे म्हणालो. त्यानंतर सायंकाळी ५.०० वा चे सुमारास फिर्यादीचे सासरे, नामदेव रूपनर, मेव्हणा राहूल रूपनर, बबलु मस्के, अमोल खरात, संभाजी महारनवर व इतर दोन अनोळखी इसम तेथे आले. त्यावेळी फिर्यादीचा सासरा नामदेव याने मला, “आमचे मुलीला आमचेसोबत पाठवा” असे म्हणाला त्यावेळी मी त्यांना, “तुमची मुलगी घेवून जावा व माझे मुलांना येथेच राहू दया” असे म्हणालो असता सासरे नामदेव व मेव्हणा राहूल व बबलू मस्के यांनी मला तु कसा काय पाठवत नाही ते बघतो.” असे म्हणून शिवीगाळी दमदाटी करून हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी मेव्हणा राहून रूपनर याने तेथे पडलेली लोखंडी पार उचलून माझे छातीवर मारून जखमी केले आहे. आमचे भांडण चालू असताना सासरा नामदेव रूपनर याने फिर्यादीचे खिशातील रुपये ३२०००/- रूपये व गळयातील दीड तोळे वजनाची सोन्याची चैन तोडून हिसकावून घेतली आहे. त्यावेळी फिर्यादी याची आई मैनाबाई ही सोडवणेसाठी मध्ये आली असता तिलाही सासरे नामदेव रूपनर व राहूल रूपनर यांनी शिवीगाळी दमदाटी करून ढकलून खाली पाडले. त्यावेळी त्याचे सोबत आलेले अमोल खरात, संभाजी महारनवर व इतर दोन अनोळखी ईसमांनी आमची भांडणे सोडवासोडवी करणेचा प्रयत्न केला, त्यानंतर फिर्यादी व फिर्यादीची आई मैनाबाई असे सर्वजण मिळून तक्रार देणेसाठी पोलीस ठाणेस आलो असता पोलीसांनी आम्हाला दवाखाना यादी दिलेनंतर आम्ही उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे जावून औषध उपचार करून पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे.

सदर प्रकारामुळे आरोपी विरुध्द भारतीय न्याय संहीताचे कलम ३५२, ३५१ (२),३५१ (१), ११९ (१), ११८ (१), ११५ (२), ३ (५) अन्वये गु.र.नं ६५/२०२५ चा गुन्हा दि.२४/०१/२०२५ रोजी रात्री ९.३९ मिनीटांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल करणेत आलेला आहे.

सदर प्रकरणात अर्जदार यांचे वतीने अॅड. संदिप कागदे यांनी युक्तीवाद केला. सदरचा युक्तीवाद ग्राह्य धरून अर्जदार यांचा अटकपुर्व जामीन मंजूर करणेत आला.

सदर प्रकरणात अर्जदार यांचे वतीने अॅड. संदिप कागदे , अॅड. काकासो केंगार यांनी काम पाहिले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ नर्सिंग महाविद्यालयाचे घवघवीत यश

पंढरपूर- महाराष्ट्र राज्य शुश्रुषा व परावैद्यक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२६ चा जी.एन.…

2 hours ago

एस.के.एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी १० दिवसीय ॲप्टिट्यूड प्रशिक्षण

पंढरपूर : एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे अंतिम वर्षातील सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी आगामी…

1 week ago

एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘स्पेक्ट्रम २के२६’चे आयोजन

कोर्टी, पंढरपूर येथील एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी स्टेट…

2 weeks ago

माढा तालुक्यात बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त तीनदिवसीय मोफत नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन

माढा विधानसभा मतदारसंघाचे मा. आ. बबनदादा शिंदे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त संकल्प फाऊंडेशन,…

2 weeks ago

ॲड. संदिप कागदे यांचे ” लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भारतीय राज्यघटना ” ह्या विषयावर व्याख्यान संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निम्मित लोकआधार फाउंडेशन यांच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.…

2 weeks ago

स्वेरीत रविवारी होणार ‘ज्ञानयात्री आदर्श पुरस्कार सोहळा’

दोन वेगवेगळे सोहळे होणार एकाच छताखाली पंढरपूर- पंढरपूर व माळशिरस तसेच सांगोला व मंगळवेढा या…

3 weeks ago